PM Modi in Bengaluru: PM मोदी आज बेंगळुरूमध्ये करणार India Energy Week चे उद्घाटन

हरित ऊर्जेच्या क्षेत्रातही ते अनेक उपक्रम सुरू करणार आहेत.

PM Narendra Modi (Pic Credit - ANI)

PM Modi in Bengaluru: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज बेंगळुरूमध्ये इंडिया एनर्जी वीक (India Energy Week) 2023 चे उद्घाटन करणार आहेत. हरित ऊर्जेच्या क्षेत्रात भारताच्या वाढत्या प्रगतीचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 34 देशांचे मंत्री आणि राष्ट्रप्रमुख या कार्यक्रमात सहभागी होतील. यात भारताच्या ऊर्जा भविष्यातील आव्हाने आणि संधींवर चर्चा करण्यासाठी 30,000 हून अधिक प्रतिनिधी, 1,000 प्रदर्शक आणि 500 ​​वक्ते एकत्र येतील.

भारत ऊर्जा सप्ताह 2023 -

भारत ऊर्जा सप्ताह 2023 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जाईल. पंतप्रधान म्हणाले की, भारत ऊर्जा सप्ताहात सहभागी होण्यासाठी ते आज बंगळुरूला भेट देतील आणि नंतर प्रमुख विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी तुमकुरूला भेट देतील. (हेही वाचा - Supreme Court New Judges: सर्वोच्च न्यायालयाला आज मिळणार पाच नवीन न्यायाधीश; सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड देणार शपथ)

या कार्यक्रमात पारंपारिक आणि अपारंपरिक ऊर्जा उद्योग, सरकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील नेत्यांना एकत्र आणून पर्यावरण वाचवणारी आव्हाने आणि संधी यावर चर्चा करण्यात येईल. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान जागतिक तेल आणि वायू सीईओंसोबत गोलमेज संवादात सहभागी होतील. हरित ऊर्जेच्या क्षेत्रातही ते अनेक उपक्रम सुरू करणार आहेत.

तथापी, पंतप्रधान मोदी ग्रीन मोबिलिटी रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील. या रॅलीमध्ये हरित ऊर्जा स्त्रोतांवर चालणाऱ्या वाहनांचा सहभाग पाहायला मिळेल आणि हरित इंधनाबाबत जनजागृती करण्यात मदत होईल. पंतप्रधान इंडियन ऑइलच्या 'अनबॉटल्ड' उपक्रमांतर्गत गणवेशाचेही लोकार्पण करतील. सिंगल-युज प्लॅस्टिक बंद करण्यासाठी, इंडियन ऑइलने एलपीजी वितरण कर्मचार्‍यांसाठी पुनर्नवीनीकरण पॉलिस्टर (RPET) आणि सूती गणवेश स्वीकारले आहेत.