PM Modi In Srinagar: योग दिनाचे नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान मोदी श्रीनगरला रवाना; दाल सरोवराच्या काठावर करणार योग

तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा आहे. श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) येथे दिवसभरात पंतप्रधान 'युवा सक्षमीकरण, जम्मू आणि काश्मीरमधील बदल' या कार्यक्रमात सहभागी होतील.

PM Narendra Modi (PC - ANI/Twitter)

PM Modi In Srinagar: आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day 2024) सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांच्या श्रीनगर (Srinagar) दौऱ्यावर रवाना झाले आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा आहे. श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) येथे दिवसभरात पंतप्रधान 'युवा सक्षमीकरण, जम्मू आणि काश्मीरमधील बदल' या कार्यक्रमात सहभागी होतील. यासोबतच ते 1500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. याशिवाय, ते 1800 कोटी रुपयांच्या कृषी आणि संलग्न क्षेत्र सुधारणा प्रकल्प (JKCIP) लाँच करतील. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी अभूतपूर्व व्यवस्थाही करण्यात आली आहे.

तथापी, शुक्रवारी दाल सरोवराच्या काठावर 7,000 हून अधिक लोक योगासने करण्यासाठी त्यांच्यासोबत सहभागी होतील. पंतप्रधानांचा दौरा शांततेत पार पडावा यासाठी श्रीनगर शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. एसकेआयसीसीकडे जाणारे रस्ते सील करण्यात आले आहेत. (हेही वाचा -International Yoga Day 2024: पंतप्रधान मोदी यांच्याकडून उष्ट्रासन योग आसनाचा व्हिडीओ शेअर; शारिरीक जडणघडणीत योगाचे महत्त्व केले अधोरेखीत)

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, SKICC मधील तपासणी आणि स्क्रीनिंग ऑपरेशन मंगळवारी पूर्ण झाले असून SKICC मधील सर्व अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि कर्तव्यावर असलेले इतर लोक आणि त्यात सहभागी खेळाडूंची सुरक्षा पार्श्वभूमी तपासण्यात आली आहे. श्रीनगर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने येथे ड्रोन आणि क्वाडकॉप्टर चालविण्यास बंदी घातली आहे. श्रीनगर शहर तात्काळ प्रभावाने 'तात्पुरते रेड झोन' घोषित करण्यात आले आहे. (हेही वाचा:PM Modi On Yoga Day 2024: पीएम मोदींनी 'ट्विटर एक्स' वर योग दिनासंदर्भात शेअर केला अनोखा संदेश, पाहा पोस्ट )

श्रीनगर तांत्रिक विमानतळावरून पंतप्रधान हेलिकॉप्टरने बदामी बागला जातील. तेथून ते राजभवनात जातील आणि तिथून रस्त्याने एसकेआयसीसीला जातील. त्यामुळे हा संपूर्ण परिसर रेड झोन घोषित करण्यात आला आहे. कारण तेथे कोणत्याही हालचालींना परवानगी दिली जाणार नाही.