Happy Birthday Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त अमित शहा, पीयुष गोयल, अशिष शेलार यांच्या सह दिग्गजांकडून जन्मदिनाच्या शुभेच्छा

या निमित्ताने देशाभरातून नरेंद्र मोदी यांना गोड शुभेच्छा (Birthday Wish) दिल्या जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोदी आपला वाढदिवस गुजरातमध्ये (Gujrat) साजरा करण्यासाठी गेले आहेत. जन्मदिवस साजरा करण्यासाठी मोदी सोमवारी रात्रीच अहमदाबाद (Ahmedabad) येथे दाखल झाले आहेत. सर्वप्रथम मोदीं हे नर्मदा नदीचे (Narmada River) दर्शन घेऊन आपली आई हिराबेन (Hiraben Modi) यांची भेट घेऊन त्यांचा आशिर्वाद घेणार आहेत. त्यानंतरच आयोजित केलेल्या इतर कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

Narendra modi (PTI)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने देशाभरातून नरेंद्र मोदी यांना गोड शुभेच्छा दिल्या जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोदी आपला वाढदिवस गुजरातमध्ये साजरा करण्यासाठी गेले आहेत. जन्मदिवस साजरा करण्यासाठी मोदी सोमवारी रात्रीच अहमदाबाद येथे दाखल झाले आहेत. सर्वप्रथम मोदीं हे नर्मदा नदीचे (Narmada River) दर्शन घेऊन आपली आई हिराबेन (Hiraben Modi) यांची भेट घेऊन त्यांचा आशिर्वाद घेणार आहेत. त्यानंतरच आयोजित केलेल्या इतर कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

भारतात नरेंद्र मोदी यांना अधिक लोकप्रिय नेता म्हणून ओळखले जाते. तसेच देशासाठी मोदींनी घेतलेल्या निर्यणाचे जगभरातून कौतुक केले जाते. आज नरेंद्र मोदी हे 69 वर्षाचे झाले आहेत. यानिमित्ताने त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घातला आहे. यासह अनेक राजकीय नेत्यांनी नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर नरेंद्र मोदींनी केलेल्या कामगिरीचे कौतुकही करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे नरेंद्र मोदी सर्वप्रथम त्यांच्या आईचा आशिर्वाद घेतात. त्यानंतर गुजरातच्या वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होतात. यावर्षीही असेच होणार आहे. वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडियावर तब्बल 109 दशलक्ष फॉलोअर्स; ट्विटरवर बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प याच्यानंतर जगात तिसरा क्रमांक.

 

भारतीय जनता पक्ष यांनी त्यांच्या ट्विटरच्या अधिकृत पेजवर नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. एक साधारण चाय विकणारा मुलगा याने कशाप्रकारे पंतप्रधानांची खुर्ची गाठली, हा प्रवास या व्हिडिओतून दाखविण्यात आला आहे.