दिवाळी निमित्त पेट्रोल- डिझेलचे दर झाले कमी; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर
काही महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले होते. परंतु आता मात्र वाहनचालकांना दिलासा देणारी ही बातमी आहे कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर आता कमी झाले आहेत.
Petrol- Diesel price: दिवाळीनिमित्त सर्व वाहनचालकांची एक खुशखबर आहे. काही महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले होते. परंतु आता मात्र वाहनचालकांना दिलासा देणारी ही बातमी आहे कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर आता कमी झाले आहेत.
मंगळवारी (29 ऑक्टोबर) सकाळी पेट्रोलच्या दरात ६ पैसे तर डिझेलमध्ये १० पैसे प्रति लीटर घट झाली. या आधी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच पेट्रोल व डिझेलच्या दरात घट झाल्याचं दिसून आलं होतं. आणि दिवाळीनंतर हे दर अजून कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Gold Shopping: सोने खरेदी करत असाल तर हा नवा नियम नक्की वाचा; बनावट सोने ओळखणे आता होणार सोपे
मुंबईतील आजचा पेट्रोलचा दर असेल ७८.५४ रुपये प्रति लीटर तर डिझेल ६९.०१ रुपये प्रति लीटरच्या भावाने उपलब्ध असेल. तर दिल्लीत आजपासून पेट्रोल ७२.९२ रुपये प्रति लीटर तर डिझेल ६५.८५ रुपये प्रति लीटरने मिळेल. तसेच कोलकातामध्ये पेट्रोल ७५.५७ रुपये तर डिझेलचा दर ६८.२१ रुपये प्रती लीटर असणार आहे आणि चेन्नईमध्ये पेट्रोल ७५.७३ रुपये प्रती लीटरवर दाखल झालंय तर डिझेल ६९.५६ रुपये प्रती लीटर आहे.
Fact Check: आरबीआय करतंय सोने विक्री? पहा व्हायरल रिपोर्ट्समागील सत्य
विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत एकूण १.५० रुपये प्रती लीटर तर डिझेलच्या किंमतीत एकूण १.२५ रुपये प्रती लीटर घट झाल्याचं दिसून येत आहे.