Today Petrol-Diesel Rate: आज पेट्रोल-डिझेलच्या दरात झाली कपात, जाणून घ्या आजचा दर
यापूर्वी सोमवारी तेलाच्या (Oil) किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. दुसरीकडे, रविवारी पेट्रोलच्या किंमतीत 20 पैशांनी कपात करण्यात आली.
आजकाल पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Rate) खूप बदल होत आहेत. इंधनाचे (Fuel) दर वर -खाली होत आहेत. सातत्याने महाग होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतून आज दिलासा मिळाला आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दोन्ही किंमतीत 15 पैशांची कपात करण्यात आली आहे. यापूर्वी सोमवारी तेलाच्या (Oil) किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. दुसरीकडे, रविवारी पेट्रोलच्या किंमतीत 20 पैशांनी कपात करण्यात आली. पेट्रोलच्या किंमतीत ही कपात सततच्या निषेधाच्या दरम्यान 35 दिवसांनंतर झाली होती. राजधानी दिल्लीत (Delhi) पेट्रोल 101.49 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेलची किंमतही 88.92 रुपये प्रति लीटरवर आली आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोल 107.52 रुपये प्रति लिटर खरेदी करता येते. तर डिझेलची किंमत 96.48 रुपये प्रति लीटर आहे.
चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 99.20 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 93.52 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 101.82 रुपये प्रति लीटर आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमत 91.98 रुपये प्रति लिटरने विकली जात आहे. किंमतीतील नरमाईचा परिणाम देशातील तेलाच्या किंमतीतील अस्थिरतेवर आधीच दिसून येत आहे. सोमवारी देखील ओएमसीने पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत बदल केला नाही.