Pitbull Attack on Girl: पाळीव कुत्र्याचा चिमुकलीवर हल्ला, पीडित गंभीर जखमी, थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद

दिल्लीतील बुरारी भागात एका मुलीवर एका पाळीव कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pitbull Attacked PC twitter

Pitbull Attack on Girl:  दिल्लीतील बुरारी भागात एका मुलीवर एका पाळीव कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्ला करणारा कुत्रा हा पिटबुल जातीचा होता. कुत्र्याने दीड वर्षाच्या मुलीला तिच्या आजोबांच्या मांडीवरून ओढून नेले. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, कुत्र्याचा मालक आणि इतर लोक मुलीला कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आहे.( हेही वाचा- सात वर्षाच्या मुलीवर पाळीव कुत्र्याचा हल्ला, पीडित गंभीर जखमी, दिल्लीतील रोहणी परिसरातील घटना)

आरडाओरड ऐकून अनेक लोक घटना स्थळी दाखल झाले आणि त्यांनी मुलीला कुत्र्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नानंतर मुलीचा कुत्र्याच्या तावडीतून वेगळे करण्यात आले. तात्काळ मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. जवळच्या शासकिय रुग्णालयात मुलीवर उपचार सुरु आहे. मुलीला अंगावर 18 टाके आणि 3 फ्रॅंक्चर आहे. गेले 17दिवस मुलगी रुग्णलायत उपचार घेत आहे.

पिटबुल जातीच्या कुत्र्यांना भारतात बंदी असताना देखील पिटबूल जातीच्या पाळीव कुत्र्याला ठेवले जाते. मागिल काही वर्षांच पिटबुल कुत्र्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. काही जण या कुत्र्याच्या हल्लात मरण पावले आहे. या जातीचे कुत्रे अति भंयकर असल्याचे समोर येत आहे.