प्रवाशाने उघडला विमानाचा आपत्कालीन दरवाजा, Indigo Flight मध्ये उडाला गोंधळ

इंडिगो 6E-7339 फ्लाइटने दबाव तपासणीनंतर लगेचच उड्डाण केले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) चौकशीचे आदेश दिले आहेत. डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

indigo (pic credit - indigo twitter)

गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी एका प्रवाशाने विमानाचा आपत्कालीन दरवाजा (Aircraft Emergency Door) उघडला तेव्हा इंडिगोच्या फ्लाइटमध्ये (Indigo Flight) गोंधळ उडाला होता. हे विमान चेन्नईहून तिरुचिरापल्लीला जात होते. विमान कंपनीने प्रवाशाची माफी स्वीकारली, पण कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे विमानाला 2 तास उशीर झाला. इंडिगो 6E-7339 फ्लाइटने दबाव तपासणीनंतर लगेचच उड्डाण केले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) चौकशीचे आदेश दिले आहेत. डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना 10 डिसेंबर रोजी चेन्नईहून तिरुचिरापल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E-7339 मध्ये घडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि सुरक्षा तपासणीनंतर विमानाने उड्डाण केले. इंडिगोने या घटनेबाबत सांगितले की, 10 डिसेंबर रोजी चेन्नई ते तिरुचिरापल्ली या फ्लाइट 6E 7339 मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने बोर्डिंग प्रक्रियेदरम्यान आपत्कालीन एक्झिट चुकून उघडले. या कृत्याबद्दल प्रवाशाने माफी मागितली. हेही वाचा Delhi: पंचतारांकित Leela Palace Hotel मध्ये 4 महिने थांबल्यानंतर लाखोंचे बिल चुकवून व्यक्ती फरार; UAE रॉयल फॅमिली स्टाफ असल्याचे सांगून केली फसवणूक

SOP नुसार, विमानाची अनिवार्य अभियांत्रिकी तपासणी झाली ज्यामुळे उड्डाणाला उशीर झाला. अलीकडे फ्लाइटमध्ये अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यापूर्वी, गेल्या वर्षी 26 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या विमानातील बिझनेस क्लासमध्ये शंकर मिश्रा नावाच्या व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत एका 70 वर्षीय महिलेवर लघवी केल्याचा आरोप आहे. महिलेने एअर इंडियाला दिलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी 4 जानेवारीला तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दुसऱ्या एका घटनेत, दोन परदेशी नागरिकांनी गोवा-दिल्ली GoFirst फ्लाइटमध्ये महिला केबिन क्रू सदस्याचा छळ केल्याचा आरोप आहे. 5 जानेवारी रोजी प्रवाशांनी फ्लाइट अटेंडंटवर असभ्य टिप्पण्या केल्या होत्या. विमान कंपनीने सांगितले होते की त्यांनी DGCA ला घटनेची माहिती दिली आणि प्रवाशांना CISF च्या स्वाधीन केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement