Elephants in Kerala: केरळमध्ये केवळ 448 हत्ती शिल्लक; गेल्या 5 वर्षांत 115 बंदिस्त हत्तींचा मृत्यू

आता फक्त 448 हत्ती उरले आहेत. गेल्या 5 वर्षात 115 बंदिस्त हत्तींचा मृत्यू झाला आहे.

Elephants (PC - Twitter)

Elephants in Kerala: केरळमध्ये बंदिस्त हत्तींची संख्या सातत्याने कमी होत आहे. 2008 मध्ये जवळपास 900 बंदिस्त हत्ती होते, परंतु आता त्यांची संख्या 50% ने कमी झाली आहे. आता फक्त 448 हत्ती उरले आहेत. गेल्या 5 वर्षात 115 बंदिस्त हत्तींचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, 14 जुलै रोजी मंगलमकुन्नू केशवन नावाच्या हत्तीचा मृत्यू झाला होता. एलिफंट टास्क फोर्सच्या अहवालात त्याला फिटनेस प्रमाणपत्राशिवाय परेडमध्ये सामील करण्यात आल्याचे समोर आले आहे. हेरिटेज अ‍ॅनिमल टास्क फोर्सचे सचिव व्ही.के. वेंकटचलम म्हणतात, बंदिवान असलेल्या हत्तींवरील क्रूरता वाढत आहे. (हेही वाचा - Suicide: शिकवणीतून घरी येण्यास वडिलांनी दिला नकार, संतप्त मुलाने 9 मजली इमारतीवरून मारली उडी)

केरळ एलिफंट ओनर्स फेडरेशनने राज्यातील सणांमध्ये परेडसाठी बाहेरून अधिक हत्ती आणण्यासाठी नियम शिथिल करण्याची मागणी केली आहे. या मागणीबाबत आपण अनेक खासदारांना भेटत असल्याचे सरचिटणीस पी शशिकुमार यांनी सांगितले. प्राणी हक्क कार्यकर्ते वेंकटचलम बाहेरून हत्ती आणण्याच्या कारवाईला विरोध करत आहेत. अशा हत्तींशीही गैरवर्तन होईल, असा त्यांचा विश्वास आहे.

केरळमध्ये दरवर्षी सरासरी 25 बंदिस्त हत्तींचा मृत्यू होतो. केरळ वन विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की बंदिस्त हत्तींच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण त्यांच्या मालकांची खराब वागणूक आहे.