Chandigarh Cyber Crime Case: नोकरी देण्याच्या बहाण्याने महिलेची 91,000 रुपयांची ऑनलाइन फसवणूक, आरोपी विरोधात गुन्हा दाखल
ज्यात एका महिलेला नोकरी (Job) देण्याच्या बहाण्याने 91,000 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. ऑनलाइन फसवणुकीची घटना जवळपास दोन महिन्यांपूर्वी घडली आहे.
चंदीगडमधून (Chandigarh) ऑनलाइन फसवणूकीचा (Online fraud) एक घटना समोर आली आहे. ज्यात एका महिलेला नोकरी (Job) देण्याच्या बहाण्याने 91,000 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. ऑनलाइन फसवणुकीची घटना जवळपास दोन महिन्यांपूर्वी घडली आहे. दिव्या असे पीडितेचे नाव आहे. ती केंद्रशासित प्रदेशातील मणिमाजरा (Manimajra) शहराची रहिवासी आहे. पीडितेने एका वेबसाईटद्वारे नोकरीसाठी अर्ज केला. पीडितेला नोकरी मिळवायची असल्यास 2,800 रुपये देण्याचा कॉल आला. मात्र दिव्याने रक्कम भरली नाही. दुसऱ्या दिवशी तिला दुसरा फोन आला की तिचे नाव काळ्या यादीत टाकण्यात आले आहे आणि ती कोणत्याही MNC मध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकत नाही. तसेच सात वर्षे परदेशात जाऊ शकत नाही. त्यामुळे घाबरून तिने पैसे जमा केले.
फसवणूक करणाऱ्यांनी तिला आधी रक्कम भरण्यास सांगितले. तसेच तिला सांगितले की तिचे संपूर्ण पैसे परत केले जातील. यात एकूण दिव्याने 91,000 रुपये दिले. दोन महिन्यांनंतरही जेव्हा तिला कोणताही फोन आला नाही, तेव्हा पीडितेने पोलिसांशी संपर्क साधला. तिने मनीमाजरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हेही वाचा Bhopal Suicide Case: मध्य प्रदेशमध्ये ऑनलाइन फसवणुकीत 5 लाख रुपये गमावल्यानंतर 26 वर्षीय महिलेने आपले आयुष्य संपवले
तिच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 420 फसवणूक आणि 120-B गुन्हेगारी कट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सायबर फसवणूकीचा छडा लावण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे.