COVID Restrictions: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार संरक्षित केलेली सर्व स्मारके 15 मे पर्यंत बंद राहणार; संस्कृती व पर्यटन मंत्रालयाचा निर्णय
त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. बुधवारी देशात कोरोना विषाणूची सुमारे दोन लाख नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यावरून देशात कोरोनाचा कहर किती भयंकर आहे याचा अंदाज येऊ शकतो.
COVID Restrictions: देशभरातील कोरोना प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत देशाच्या निरनिराळ्या भागात निर्बंध सतत लागू केले जात आहेत. देशातील विविध राज्यात नाईट कर्फ्यू, शनिवार व रविवार लॉकडाउन, मिनी लॉकडाउन सारख्ये निर्बंध लादले गेले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार संरक्षित केलेली सर्व स्मारके 15 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय संस्कृती व पर्यटन मंत्रालयाने घेतला आहे.
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे की, "कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार संरक्षित केलेली सर्व स्मारके 15 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाने घेतला आहे."(वाचा - कोरोनाग्रस्त रुग्णांना मुकेश अंबानी यांच्याकडून मोठी मदत; रुग्णालयांसाठी रिफायनरीमधून पाठवला मोफत ऑक्सिजन)
सध्या देशभरात कोरोनाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. बुधवारी देशात कोरोना विषाणूची सुमारे दोन लाख नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यावरून देशात कोरोनाचा कहर किती भयंकर आहे याचा अंदाज येऊ शकतो. त्याचबरोबर मृत्यूच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. अशाप्रकारे कोरोनाची दुसरी लाट सतत नवीन रेकॉर्ड रचत आहे. कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरून देशातील भयानक परिस्थितीचा अंदाज येतो.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी रात्रीपर्यंत देशात 199,569 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून एकाच दिवसात आढळलेल्या कोरोना संसर्ग होण्याची ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेतदेखील एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले नव्हते. दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे राज्य तसेच केंद्र सरकारची चिंता वाढली आहे.