Mathura Shocker: शिक्षकाचा वर्गात विद्यार्थ्यींवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न,गुन्हा दाखल; मथूरा येथील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

वर्गात बसलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

UP girl Molestation Video

Mathura Shocker: गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी युपीतून धक्कादायक समोर येत आहे. मथुरा येथील शाळेतील शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना वर्गात बसलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे शिक्षकाने मुलीला वर्गात एकटी थांबायला सांगितल्या नंतर त्याने मुलीला पकडण्याच्या प्रयत्नात दिसतो. पीडित मुलीने या घटनेची माहिती पालकांना दिली.

पीडित मुलीच्या पालकांनी शिक्षकाविरुध्दात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. गोविंद असं आरोपी शिक्षकांचे नाव आहे. वृत्तांनुसार स्थानिक पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.पीडितेने विकृत शिक्षकावर तिचा विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. ही घटना मंगळवारी घडली आहे. ही घटना कोसीकलन भागातील एका हायस्कूलची आहे. गोविंद असे आरोपी शिक्षकाचे नाव असून तो सध्या फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षकाच्या या कृतीमुळे नागरिकांनी शाळेच्या सुवव्यस्थेवर प्रश्न उभा केला आहे.

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थींनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा पोलीसांनी आरोपीला अटक केले आहे. आरोपीवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement