Bihar News: कार नाल्यात अडकल्याने अधिकारी अपहरणाच्या प्रयत्नातून बचावले, पुढील चौकशी सुरु
अधिकारी हाजीपूरहून पाटण्याला त्यांच्या कारने जात असताना ही घटना घडली.
Bihar News: बिहारमधील हाजीपूरमध्ये शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आले. अधिकारी हाजीपूरहून पाटण्याला त्यांच्या कारने जात असताना ही घटना घडली.कार नाल्यात अडकल्याने अधिकारी अपहरणाच्या प्रयत्नातून बचावले. उदय कुमार उज्ज्वल असं अपहरण करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. उदय कुमार हे शिक्षण विभागाचे समन्वयक म्हणून काम करतात. खंडणी प्रकरणातून त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याकडून 5 कोटी रुपयांची खंडणी उकळली जात होती.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ डिसेंबरच्या रात्री उज्ज्वल हाजीपूरहून पाटणा येथे आपल्या घरी जात होते. दरम्यान ही घटना घडली. हाजीपूर- छपरा महामार्गाजवळ दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी त्यांच्या कारला अडवले. त्यानंतर कार चालकाला मारहाण करून कारमधून बाहेर फेकले. त्यांनी सरकारी अधिकाऱ्याला गाडीत बसवले, त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याला 5 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली. 5 कोटींची रक्कम उकळण्यासाठी अधिकाऱ्यावर दबाब टाकला.त्यांच्याकडून एटीएम पीन देखील मागितला. काही वेळ कार चालवल्यानंतर चालकाने चुकून कार नाल्यात वळवले आणि कार नाल्यात अडकली.
त्यानंतर वेळप्रसंगी अधिकारी घटनास्थळावरून पळ काढला आणि त्यांनी लगेच ही संपुर्ण घटना पोलिस ठाण्यात सांगितली. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली. पीडितेकडून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत त्याचे वाहन घटनास्थळावरून जप्त केले. पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली. घटनास्थळी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही ते तपासत आहेत.