OBC Reservation In Sainik Schools: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! देशातील सैनिक शाळांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण

पुढील वर्षापासून म्हणजेचं 2021-22 या शैक्षणिक सत्रापासून देशातील 31 सैनिक शाळांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) 27 टक्के आरक्षण लागू केलं जाणार आहे.

Representational Image (PC -Wikimedia Commons)

OBC Reservation In Sainik Schools: केंद्र सरकारने देशातील सैनिकी शाळांसाठी (Sainik Schools) मोठा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून म्हणजेचं 2021-22 या शैक्षणिक सत्रापासून देशातील 31 सैनिक शाळांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) 27 टक्के आरक्षण लागू केलं जाणार आहे. यासंदर्भात संरक्षण सचिव अजय कुमार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे. यासंदर्भात देशातील सर्व सैनिकी शाळांच्या मुख्याध्यापकांना आदेशाची परिपत्रके पाठवण्यात आली आहेत, अंसंही अजय कुमार यांनी सांगितलं आहे. सैनिकी शाळांमधील 67 टक्के जागा ज्या ठिकाणी शाळा आहे किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत, तेथील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. तसेच उर्वरित 33 टक्क्यांमध्ये इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. मात्र, आता यात जनरल, एससी-एसटी, ओबीसी असा कोटा असणार आहे.

या कोट्यासंदर्भात सर्व शाळांच्या प्राचाऱ्यांना 13 ऑक्टोबर रोजी आदेश देण्यात आले आहे. सैनिक शाळांमधील ओबीसींसाठी 27 टक्के जागा या विद्यमान कोट्या व्यतिरिक्त असतील. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाबाबतचे निकष मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नियमांनुसार असणार आहेत. (वाचा - Bihar Assembly Election 2020: नीतीश कुमार यांचा नवा डाव, 'लोकसंख्येच्या आधारे आरक्षण द्या'; देशभर चर्चा)

दरम्यान, सैनिकी शाळामधील 15 टक्के जागा अनुसूचित जाती, 7.5 टक्के अनुसूचित जमातीसाठी आणि 27 टक्के जागा ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहेत. सध्या देशात 33 सैनिकी शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून ओबीसी आरक्षण लागू होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.