Miss Universe 2023: आता विवाहित महिलाही बनू शकतात मिस युनिव्हर्स; 2023 पासून लागू होणार 'हा' नवा नियम
आता वयोमर्यादा आहे. पण, तुम्ही विवाहित असाल किंवा आई देखील असाल, तरीही तुम्ही या सौंदर्य स्पर्धेसाठी पात्र असालं.
Miss Universe 2023: मिस युनिव्हर्सबाबत नवा नियम करण्यात आला आहे. ज्या अंतर्गत आता विवाहित महिला (Married Women) देखील या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. मात्र, मिस युनिव्हर्स (Miss Universe) च्या 72व्या आवृत्तीपासून हा नियम लागू होणार आहे. जुन्या नियमांनुसार 18 ते 28 वयोगटातील केवळ अविवाहित महिलांनाचं स्पर्धेत भाग घेता येणार होता. आता वयोमर्यादा आहे. पण, तुम्ही विवाहित असाल किंवा आई देखील असाल, तरीही तुम्ही या सौंदर्य स्पर्धेसाठी पात्र असाल. 2021 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब भारताच्या हरनाज संधूने जिंकला होता.
मिस युनिव्हर्सच्या आयोजकांनी मेमो जारी करून या बदलाची माहिती दिली आहे. या चिठ्ठीत म्हटले आहे की, 'लग्न हा महिलांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्या त्यांच्या आयुष्यातील हा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. आम्हाला त्यांच्या यशात कोणत्याही प्रकारे अडथळा आणायचा नाही. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. फॉक्स न्यूजनुसार, यापुढे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी Maternal आणि Paternal स्टेटसची आवश्यकता नाही. (हेही वाचा - Kangana Ranaut to Sue Filmfare: चित्रपटाला नामांकन दिल्याने कंगना रणौत ठोकणार फिल्मफेअरवर दावा; म्हणाली- 'हे माझ्या प्रतिष्ठेच्या, कामाच्या नीतीच्या विरुद्ध')
2020 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणाऱ्या मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. ती म्हणाली, 'वैयक्तिकरित्या मी आनंदी आहे. स्त्रिया आता नेतृत्व पदांवर विराजमान आहेत. आता वेळ आली आहे. सौंदर्य स्पर्धांमध्येही बदल व्हायला हवा. या स्पर्धेत आता कुटुंबातील महिलांनीही सहभागी व्हायला हवं. पूर्वीचे नियम महिलाविरोधी आणि वास्तवाच्या पलीकडे होते. लोकांना सुंदर आणि अविवाहित आणि नात्यासाठी उपलब्ध असलेली स्त्री पाहायची होती.'