Karnataka POCSO Case: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; पोक्सो प्रकरणी कारवाई

त्या प्रकरणाच्या संदर्भात, पीडितेच्या भावाने राज्य पोलिसांच्या निष्क्रियतेला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली आणि अटक आदेशाची मागणी केली.

B. S. Yediyurappa (PC - Facebook)

Karnataka POCSO Case: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी.एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांच्या विरोधात POCSO प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) जारी करण्यात आले आहे. मार्च 2024 मध्ये पीडितेच्या आईने बेंगळुरू (Bangalore) मधील सदाशिवनगर पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणाच्या संदर्भात, पीडितेच्या भावाने राज्य पोलिसांच्या निष्क्रियतेला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली आणि अटक आदेशाची मागणी केली.

पीडितेच्या भावाच्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या फर्स्ट फास्ट ट्रॅक कोर्टाने आज दुपारी हा आदेश दिला आणि आरोपींवर गुन्हा दाखल केला. न्यायालयाने माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश देणारे अजामीनपात्र वॉरंट जारी केले. (हेही वाचा -Child Sex Abuse प्रकरणी युट्युबर Kuwari Begum विरोधात गुन्हा दाखल)

येडियुरप्पा यांच्यावर पोक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 354 ए (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येडियुरप्पा यांच्यावर आरोप लावणाऱ्या 54 वर्षीय महिलेचा गेल्या महिन्यात फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला होता. (हेही वाचा - Thai Girl Assaulted inside SMIMER Hostel: सूरतच्या मेडिकल कॉलेज मध्ये बॉईज हॉस्टेल मध्ये 'थाई मुली'चा हंगामा; पोलिस तपास सुरू)

81 वर्षीय येडियुरप्पा यांनी हे आरोप फेटाळले असून त्यांनी हे प्रकरण कायदेशीररित्या लढणार असल्याचे सांगितले आहे. तथापी, कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. आवश्यक असल्यास येडियुरप्पा यांना अटक केली जाऊ शकते.