Noida Accident Video: नोएडात भीषण रस्ता अपघात! जेवण करून परतणाऱ्या मित्रांच्या कारची ट्रॅक्टरला धडक, चार ठार, एक जखमी

नोएडाच्या सेक्टर 24 मध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. ज्यात अल्टो कार ट्रॅक्टरला धडकली. या अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला, तर एकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात कारचा पूर्ण चक्काचूर झाला असून, कारची अवस्था पाहता हा अपघात किती गंभीर असेल हे समजू शकते.

Noida Accident Video: नोएडात भीषण रस्ता अपघात! जेवण करून परतणाऱ्या मित्रांच्या कारची ट्रॅक्टरला धडक, चार ठार, एक जखमी
Noida Accident Video

Noida Accident Video: नोएडाच्या सेक्टर 24 मध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. ज्यात अल्टो कार ट्रॅक्टरला धडकली. या अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला, तर एकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात कारचा पूर्ण चक्काचूर झाला असून, कारची अवस्था पाहता हा अपघात किती गंभीर असेल हे समजू शकते. सर्व मृत न्यू अशोक नगर येथील रहिवासी असून ते रात्री जेवायला गेले होते. हे लोक आपल्या कारने परतत असताना त्यांची कार एका ट्रॅक्टरला धडकली. ही टक्कर इतकी भीषण होती की, यात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मोहित, विशाल, मनीष आणि हिमांशू अशी मृतांची नावे आहेत. हे देखील वाचा: Kubra Aykut Dies by Suicide: स्वतःशी लग्न करणाऱ्या 26 वर्षीय तुर्किश टिकटॉक स्टार कुब्रा आयकुटने केली आत्महत्या; 5 व्या मजल्यावरून मारली उडी

नोएडामध्ये भीषण कार अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी हिमांशू कार चालवत होता. या घटनेप्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अपघातानंतर मृताच्या घरावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. @amitchoudhar_y या हँडलवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2024 02:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).