Noel Tata Appointed As New Chairman of Tata Trusts: मोठी बातमी! टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांची नियुक्ती
या ट्रस्टचा एकत्रितपणे टाटा सन्समध्ये 66% इतका महत्त्वाचा हिस्सा आहे, जी टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक धर्मादाय संस्था म्हणून, रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या मंडळाला विद्यमान विश्वस्तांमधून नवीन अध्यक्ष नियुक्त करणे आवश्यक होते.
Noel Tata Appointed As New Chairman of Tata Trusts: 67 वर्षीय नोएल टाटा (Noel Tata) यांची टाटा ट्रस्ट (Tata Trusts) च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर ट्रस्टशी संबंधित संस्थांचे नेतृत्व करण्यासाठी नोएल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा समूहातील सर्वात महत्त्वाच्या दोन धर्मादाय संस्थांच्या प्रमुखपदी नोएल यांच्यावर जबाबदारी सोपवत बोर्डाने एकमताने हा निर्णय घेतला.
नोएल टाटा हे आधीपासून सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. या ट्रस्टचा एकत्रितपणे टाटा सन्समध्ये 66% इतका महत्त्वाचा हिस्सा आहे, जी टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक धर्मादाय संस्था म्हणून, रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या मंडळाला विद्यमान विश्वस्तांमधून नवीन अध्यक्ष नियुक्त करणे आवश्यक होते. रतन टाटा यांनी मृत्यूपूर्वी कोणत्याही उत्तराधिकाऱ्याचे नाव दिले नव्हते. (हेही वाचा -Ratan Tata Successor: रतन टाटा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? कोणाकडे जाणार 3800 कोटींची मालमत्ता? वाचा सविस्त)
टाटा सन्सच्या अध्यक्षपदासाठी यापूर्वी नोएलचा विचार करण्यात आला होता. परंतु, नंतर ही भूमिका अखेरीस सायरस मिस्त्री यांच्या मेहुण्याकडे गेली. मिस्त्री यांच्या वादग्रस्त एक्झिटनंतर एन चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारले. नोएल टाटा यांची चेअरमन म्हणून नियुक्ती हे भविष्यासाठी एक नवीन मार्ग आखताना वारसा जपण्याचे उद्दिष्ट आहे. (हेही वाचा - Ratan Tata यांना होता 'हा' गंभीर आजार; हळूहळू सर्व अवयव झाले निकामी, काय आहेत या आजाराची लक्षणे? जाणून घ्या)
कोण आहेत नोएल टाटा? (Who is Noel Tata)
67 वर्षीय नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ असून ते टाटा ट्रस्टसह टाटा समूहाशी अनेक वर्षांपासून संबंधित आहेत. ते नवल टाटा यांचे पुत्र आहेत. ते आधीपासून सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टच्या बोर्डवर विश्वस्त आहेत. सध्या नोएल हे घड्याळ उत्पादक कंपनी टायटन आणि टाटा स्टीलचे उपाध्यक्ष आहेत. ते टाटा समूहाच्या किरकोळ कंपनी ट्रेंट (जुडिओ आणि वेस्टसाइडचे मालक) आणि तिची NBFC फर्म टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पचे अध्यक्ष देखील आहेत. नोएल व्होल्टासच्या बोर्डवर काम करतात. नोएल टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत, जिथून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली.