IPL Auction 2025 Live

NIA कडून 10 संशयित दहशवाद्यांना अटक, घातपात करण्याचा रचला होता कट

राष्ट्रीय तपास संस्थने (NIA) अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांनी दिल्लीतील मोठी बाजारपेठे, मुख्य ठिकाणी हल्ला करण्याचे ठरविले होते.

(Photo credit: ANI)

राष्ट्रीय तपास संस्थने (NIA) अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांनी दिल्लीतील मोठी बाजारपेठे, मुख्य ठिकाणी हल्ला करण्याचे ठरविले होते. आयसिसच्या या संघटनेतील दहशतवादी हे मौलावी ते इंजिनअर असल्याचा धक्कादायक खुलासा एएनआय ने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला आहे.

एएनआय (ANI) च्या पत्रकार परिषदेमध्ये, अटक केलेल्या दहशतवाद्यांनी येणाऱ्या काही दिवसात बाँम्ब हल्ला आणि फियादीन हल्ला करण्याचे ठरविले होते. सर्वजण हे आयसिसच्या नवीन मॉड्युलमधील 'हरकत उल हर्ब ए इस्लाम'(Harkat ul harb e islam) या संघटनेचा हिस्सा आहेत. तर अटक केलेल 5 दहशतवादी हे दिल्लीचे असून उर्वरित 5 दहशतवादी उत्तर प्रदेशाचे आहेत. (हेही वाचा- ISIS चा गँगस्टर 'हाफिज'ला NIA कडून अटक)

या दहशतवाद्यांकडून देशी बनावटी बंदुका, देशी रॉकेट लॉन्चर आणि स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 7.5 लाख रुपयांची रोकड, 100 मोबाईल आणि 153 सीमकार्ड ही हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच हे सर्व दहशतवादी व्हॉट्सअॅप आणि टेलीग्रामच्या सहाय्याने एकमेकांच्या संपर्कात असल्याचे मित्तल यांनी सांगितले आहे.