मुकेश अंबानी यांच्या Jio GigaFibre चे होणार लॉन्चिंग; DTH-केबल TV मार्केटमध्ये रंगणार Price War; ग्राहकांना मिळणार फायदा
यात टाटा स्काय आणि एअरटेल डीटीएच यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. जिओ फायबर ब्रॉडब्रँड नेटवर्क 2019 या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच दिवाळीनंतर लॉन्च होण्याची शक्यता आहे. मुंबई, दिल्ली-एनसीआर, अहमदाबाद आणि सूरत आदी शहरांमध्ये टेस्टींग सुरु असल्याची माहिती आहे.
देशभरातील असंख्य लोकांच्या टीव्ही मनोरंजनाचा मार्ग सुखकर करणाऱ्या DTH-केबल मार्केटमध्ये किंमत युद्ध (Price War) भडकण्याची शक्यता आहे. मुकेश अंबानी यांची Jio GigaFiber ही कंपनी या किंमत युद्धाचे कारण ठरण्याची शक्यता आहे. Jio GigaFiber कंपनी लॉन्चिंगसाठी तयार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. दिल्ली येथील वीकॉन मीडिया या कंपनीने रिलायन्स Big TV चे 2017 मध्येच अधिग्रहण केले होते. तेव्हापासून DTH-केबल बाजार अभ्यासक आणि विश्लेषक सांगतात की, बाजारात पुन्हा एकदा कन्सोलिडेशन पाहायला मिळू शकते. असे घडले तर त्याचा फायदा ग्राहकांना नक्कीच मिळू शकतो असे, हे विश्लेषक सांगतात.
DTH-केबल TV मार्केटमध्ये रंगणार Price War
DTH-केबल मार्केटमध्ये काही मातब्बल कंपन्यांनी या आधीच आपले स्थान बळकट केले आहे. यात टाटा स्काय आणि एअरटेल डीटीएच यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. जिओ फायबर ब्रॉडब्रँड नेटवर्क 2019 या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच दिवाळीनंतर लॉन्च होण्याची शक्यता आहे. मुंबई, दिल्ली-एनसीआर, अहमदाबाद आणि सूरत आदी शहरांमध्ये टेस्टींग सुरु असल्याची माहिती आहे. रिलायन्स जिओ गीगा फायबर सर्विसमध्ये 100 मेगाबाईट इतके स्पीड ऑफर केले जाऊ शकते. ग्राहक हे अधीक स्पीडचे भुकेले असतात. त्यामुळे 4500 रुपयांच्या रिफंडेबल रकमेसोबत तुम्ही हे स्पीड घेऊ शकता. (हेही वाच, जास्त पैसे मोजूनही तुमचे इंटरनेट स्लो चालतंय? त्यासाठी आवश्यक आहे 'नेट न्यूट्रॅलिटी')
Jio GigaFiber घेण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स आणि पद्धत
- फोटो
- GigaFiber कनेक्शनसाठी शुक्ल भरल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक SMS येईल, ज्यात
- तुमच्या कनेक्शनबाबत सूचना असेन.
- पुढे तुम्हाला हार्डवेअर इन्स्टॉलेशनबाबत माहिती मिळेल.
- इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर गीगा हब होम गेटवेसोबत कनेक्शन सेट करेन.
- ही प्रक्रीया पूर्ण झाल्यावर काही वेळातच आपली सेवा सुरु होईल.
- नवे कनेक्शन आणि अधिक माहिती घेण्यासाठी ग्राहक Jio.com किंवा MyJio app या
- संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
Jio GigaFiber इंटरनेटही पुरवणार
बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, Jio GigaFiber सर्विस ग्राहकांना इंटरनेट सेवाही देणार आहे. मात्र अन्य DTH सेवा देणाऱ्या कंपन्या इंटरनेट सेवा देत नाहीत. त्यामुळे देशभरातील ग्राहक इंटरनेटची सेवा मिळविण्यासाठी Jio GigaFiber सेवा घेण्यास प्राधान्य देऊ शकतात.
Jio GigaFiber सेवेसाठी शुक्ल किती?
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, Jio GigaFiber सेवा घेण्यासाठी ग्राहकांना 4500 रुपये शुक्ल भरावे लागणार असल्याचे समजते. हे शुल्क ग्राहक Paytm, Jio Money, क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा कॅश पे करुनही भरु शकतात.