ZydusCadila च्या COVID 19 विरूद्ध संभाव्य लसीचे पहिल्या टप्प्यातील निष्कर्ष समाधानकारक; 6 ऑगस्ट पासून दुसर्‍या टप्प्याला सुरूवात

सध्या भारतामध्ये भारत बायोटेक आणि आयासीएमआरच्या कोवॅक्सिन पाठोपाठ Zydus Cadila ला क्लिनिकल ट्रायल्ससाठी परवानगी देण्यात आली होती.

Zydus Cadila | Photo Credits: Twitter/ ZydusUniverse

भारतामध्ये Zydus Cadila च्या कोविड 19 विरूद्धच्या संभाव्य लसीचे पहिल्या टप्प्यातील निष्कर्ष समाधानकारक आल्यानंतर आता उद्यापासुन (6 ऑगस्ट) देशात दुसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सना सुरूवात होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ZyCoV-D ही लस पहिल्या टप्प्यात समाधानकारक निकाल देण्यात यशस्वी ठरली आहे. सध्या भारतामध्ये भारत बायोटेक आणि आयासीएमआरच्या कोवॅक्सिन पाठोपाठ Zydus Cadila ला क्लिनिकल ट्रायल्ससाठी परवानगी देण्यात आली होती. COVISHIELD: सीरम इंस्टिट्युट ला भारतामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून बनवल्या जात असलेल्या कोविड 19 विरूद्ध संभाव्य लसी च्या क्लिनिकल ट्रायल 2, 3 साठी परवानगी

Zydus Cadila ने त्यांच्या लसीची ट्रायल 15 जुलै पासून सुरू केली होती. निरोगी व्हॉलेटियर्सवर ही लस देण्यात आली होती. ही लस सुरक्षित असल्याचं समजलं आहे. तसेच pre-clinical toxicity studies मध्येच ही लस सुरक्षित, इम्युजेनिक आणि गंभीर दुष्परिणाम न दाखवणारी असल्याचं समोर आलं आहे. प्राण्यांवर केलेल्या अभ्यासामध्ये या लसीद्वारा neutralizing antibodies तयार होत असल्याचं समोर आलं आहे. उद्यापासून सुरू होणार्‍या दुसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलमध्ये लस देणार्‍यांमध्ये humoral आणि cellular immune response तपासला जाणार आहे.

सध्या जगभरामध्ये 100 पेक्षा अधिक लसींवर संशोधन सुरू आहे. सुमारे 24 लसी वेगवेगळ्या टप्प्यात पोहचल्या आहेत. भारतामध्ये आता युकेमधील अ‍ॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांच्या एकत्र प्रयत्नाने बनवल्या जाणार्‍या लसीच्या क्लिनिकल ट्रायल 2 आणि 3 लादेखील परवानगी मिळाली आहे. आठवड्याभरात भारतात त्यांना कोवीशिल्ड या लसीची देखील ट्रायल्स सुरू होणार आहेत.