Zomato IPO: झोमॅटो आयपीओला सुरुवात होताच तासाभरात रिटेल सेगमेंटचे ओव्हर सब्सक्रिप्शन

शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या झोमॅटोच्या आयपीओला आजपासून सुरुवात झाली.

Zomato (Photo Credits: IANS)

शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार (Share Market Investors) आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या झोमॅटोच्या आयपीओला (Zomato IPO) आजपासून सुरुवात झाली. 72-76 रुपये प्रती शेअर असलेल्या झोमॅटोच्या आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठीचे शेअर्स अगदी एका तासात भरले गेले. अजूनपर्यंत आयपीओचे 20 टक्के सब्सक्रीप्शन लोकांकडून झाले आहे. अॅंकर बुक अलोकेशनच्या खाली कंपनीने काही इंस्टीट्युशनल इंव्हेस्टर्संना शेअर्स दिले आहेत. 76 रुपये प्रति शेअर प्रमाणे 55.2 कोटींचे शेअर्स अंकर इन्व्हेटर्संना दिले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

या अंकर इन्व्हेटर्समध्ये गर्व्हरमेंट ऑफ सिंगापूर, ब्लॅक रॉक, गोल्ड मॅन सॅच, अबुदाबी इन्व्हेस्टमेंट ऑथिटी यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसोबतच डॉमेस्टिक म्युच्युअल फंड्सना सुद्धा 18.4 कोटीचे शेअर्स देण्यात आले होते. यामुळे 4196 कोटीच्या अँकरबुकमधील 1399 कोटींचे शेअर्सचे सब्सक्रिप्शन करण्यात आले, अशी माहिती एंजल ब्रोकिंग लिमिटेडच्या इक्वव्हीटी स्ट्रॅटजीस ज्योतीरॉय यांनी दिली.

अँकरबुक्स कडून आयपीओमध्ये उपलब्ध झालेल्या शेअर्समुळे इंस्टीट्युशनल आणि रिटेल इंव्हेस्टर्सकडून आयपीओला चांगली मागणी मिळण्याची शक्यता आहे. उत्तम डिलिव्हरी नेटवर्क, चांगला टर्नअराऊंड आणि मोठ्या शहरामध्ये असलेली वाढीची संधी या सर्व गोष्टींमुळे झोमॅटोच्या आयपीओमधून चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे. या आयपीओमध्ये 375 कोटी इन्फोएजकडे असून 9000 कोटी फ्रेश इश्यूमध्ये उपलब्ध आहेत.

झोमॅटोचा आयपीओ आज सकाळी 10 वाजता सुरु झाला. 16 जुलै 2021 ला संध्याकाळी 4.30 वाजता याचे सब्सक्रिप्शन बंद होईल. या आयपीओच्या अलॉटमेंटचे काम 22 जुलैला होणार असून अलॉटमेट न मिळालेल्यांना 23 जुलै पर्यंत पैसे रिफंड मिळतील. 27 जुलैपासून झोमॅटोचे शेअर्स बीएसई वर विक्रीसाठी उपलब्ध होतील. झोमॅटो आयपीओचे सब्सक्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला 72-76 रुपयांचे 195 शेअर्स विकत घेणे गरजेचे आहे.