Zerodha Glitch and Loss: झिरोधा डेव्हलपर बगमुळे ₹10 लाखांचे नुकसान; ग्राहकाने मागितले स्पष्टीकरण, कंपनीकडून प्रतिसाद, सोशल मीडियावर चर्चा
या वापरकर्त्याला ब्रोकरेजमध्ये कथीतपणे 10 लाख रुपयांचे नुकसान (Financial Loss) झाले आहे. 'ओव्हरट्रेडर' हँडलने ओळखल्या जाणाऱ्या वापरकर्त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे Twitter) वर त्याचा अनुभव तपशीलवार सांगितला.
ऑनलाइन ब्रोकरेज फर्म Zerodha सोशल मीडियावर एका वापरकर्त्याने डेव्हलपर बगची तक्रार केल्यामुळे चर्चेत आले आहे. या वापरकर्त्याला ब्रोकरेजमध्ये कथीतपणे 10 लाख रुपयांचे नुकसान (Financial Loss) झाले आहे. 'ओव्हरट्रेडर' हँडलने ओळखल्या जाणाऱ्या वापरकर्त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे Twitter) वर त्याचा अनुभव तपशीलवार सांगितला. त्याने असे नमूद केले की "अंमलबजावणी समस्या/डेव्हलपर बग" ने त्याच्या ऑर्डरवर प्रक्रिया (OnlineTrading) होण्यापासून रोखले, ज्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. वापरकर्त्याने सोशल मीडियावर एक लांबलच पोस्ट लिहून संपूर्ण घटनाक्रमच स्पष्ट केला आहे.
'Overtrader' ने सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हटले?
1. त्याने सकाळी 9:19 वाजता मार्केट ऑर्डर दिली.
2. सर्व ऑर्डर त्याच्या ऑर्डर बुकमध्ये ओपन स्टेटससह सूचीबद्ध केल्या होत्या.
3. त्याने 15-20 वेळा ऑर्डर रद्द करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला.
4. त्याच्या उपलब्ध मार्जिनमध्ये संपूर्ण प्रक्रियेदरम्यान चढ-उतार होत होते.
झिरोधाच्या अंमलबजावणी समस्येमुळे/विकासकांच्या बगमुळे मी 10L गमावले. मी पैसे नेमके का गमावले याबाबत मला माहिती मिळू शकेल काय, असा सवालही त्याने झिरोधाला उद्देशून केला आहे. त्याची सोशल मीडिया पोस्ट पाहून इतर वापरकर्त्यांनी देखील त्यांच्या खरेदी ऑर्डरवर परिणाम करणाऱ्या तांत्रिक अडचणींबद्दल त्यांची निराशा व्यक्त केली. झेरोधाने या समस्येचे निराकरण झाल्याची घोषणा केल्यानंतरही, वापरकर्त्यांनी त्यांचा असंतोष आणि संताप ऑनलाइन व्यक्त केला. (हेही वाचा, Trading Platforms Down: ट्रेडिंग प्लॅटफॉर्म Groww, Zerodhaसह CDSL वेबसाईट डाऊन, वापरकर्ते चिंतेत)
एक्स पोस्ट
सोशल मीडियावर रश्शद रशीद या वापरकर्त्याने कायदेशीर कारवाईची धमकी देत म्हटले आहे की, "#zerodha अडकला. माझ्या आदेशांची (ऑर्डर) अंमलबजावणी होत नाही. माझा एक पैसाही गमावला तर तुम्हाला न्यायालयात नेईन." दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, "एका#Zerodha ट्रेडरने एखदा तांत्रिक त्रुटीमुळे ₹2.1 लाख गमावले. तो आता कोर्टात जात आहे.
व्हिडिओ
एक्स पोस्ट
झिरोधाची प्रतिक्रिया
झेरोधा यांनी ट्विटरवर समस्येचे निराकरण केले आहे, असे सांगून आणि कोणत्याही गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. "आमच्या वापरकर्त्यांपैकी काही वापरकर्त्यांना काही ऑर्डरची नवीनतम स्थिती पाहताना समस्या येत होत्या, तरकाही ऑर्डर स्वतः यशस्वीरित्या दिल्या गेल्या होत्या. या समस्येचे आता निराकरण करण्यात आले आहे. नवीन ऑर्डरची आता निट काम करत आहे. आम्ही जुन्या ऑर्डरची स्थिती अद्यतनित करण्यावर काम करत आहोत. झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत,” असे ट्विट झिरोधा यांनी केले.
एक्स पोस्ट
तथापि, काही वापरकर्त्यांनी प्रतिसाद दिला की समस्यांचे पूर्णपणे निराकरण झाले नाही आणि झालेल्या आर्थिक नुकसानासाठी जबाबदारीची ब्रोकरणे घ्यावी अशी, मागणी केली. "प्रश्न अद्याप सुटलेला नाही..." एका वापरकर्त्याने लिहिले. दुसऱ्याने विचारले, “तोटा कोण भरणार??? झिरोधा तयार आहे का??" झिरोधा यांना यापूर्वीही अशाच समस्यांचा सामना करावा लागला आहे. या वर्षी जूनमध्ये, ब्रोकरेज फर्मला ऑर्डर प्लेसमेंटशी संबंधित तांत्रिक बिघाडाचा अनुभव आला, ज्यामुळे त्याच्या वापरकर्त्यांमध्ये चिंता वाढली.