Rajasthan Shocker: सिगारेट न दिल्याच्या कारणावरून राजस्थानमध्ये एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

राजस्थानमधील उदयपूरमध्ये सिगारेट न दिल्याने झालेल्या वादातून एका 20 वर्षीय तरुणाची त्याच्या मित्रांनी चाकू भोसकून हत्या केली.

Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

राजस्थानमधील उदयपूरमध्ये सिगारेट न दिल्याने झालेल्या वादातून एका 20 वर्षीय तरुणाची त्याच्या मित्रांनी चाकू भोसकून हत्या केली. दोन दिवसांपूर्वी हा गट दारूचे सेवन करत असताना ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले. राजस्थान पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी जय उर्फ जितेंद्र याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा पीडित रोहित आणि त्याचे मित्र जय आणि सुमित सिंग हे दारूचे सेवन करत होते. जयने रोहितला सिगारेट मागितली आणि त्याने नकार दिल्याने जय आणि सुमितने त्याच्यावर चाकूने वार केले. रुग्णालयात उपचारादरम्यान सुमितचा मृत्यू झाला.  (हेही वाचा - Firing Inside New Delhi Rajdhani Express: राजधानी एक्सप्रेसमध्ये तिकिटावरून झालेल्या टीटीईसोबतच्या भांडणानंतर ट्रेनमध्ये गोळीबार, कोणीही जखमी नाही)

या परिसरातून मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींनी चाकू मारल्यानंतर घाईघाईने घटनास्थळावरून निघून गेल्याचे दिसून आले आहे. या हत्येमध्ये दोन आरोपींचा सहभाग असल्याचेही व्हिज्युअल्समधून दिसून आले आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती पळून जाताना आणि पळून जाण्यापूर्वी त्यांचा पडलेला मोबाइल फोन परत घेण्यासाठी थांबताना दिसत आहेत. दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.