Yes Bank आजपासून निर्बंधमुक्त होणार, संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरु होणार बँकेच्या सर्व सेवा
त्यानुसार, हे निर्बंध आजपासून हटविण्यात येत आहेत. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून हे निर्बंध हटविण्यात येतील.
आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेवर (Yes Bank) आरबीआयने 5 मार्च ते 3 एप्रिल या काळासाठी निर्बंध घातले होते. त्यानुसार महिनाभरात खातेदारांना खात्यातून केवळ 50000 रुपये काढता येणार होते. या निर्णयामुळे या बँकेतील खातेधार मोठ्या धर्मसंकटात अडकले होते. ज्या खातेदारांची वर्षोनुववर्षे या बँकेत आपले खाते आहेत त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. केंद्र सरकारने येस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला (Yes Bank Ltd Reconstruction Scheme 2020) अधिसूचित केले होते. त्यानुसार, हे निर्बंध आजपासून हटविण्यात येत आहेत. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून हे निर्बंध हटविण्यात येतील.
भारतीय रिझर्व्ह बँकेने 5 मार्चपासून येस बँकवरील निर्बंध घातले होते. बँकेतून रक्कम काढण्यास निर्बंध घालण्यात आल्याने खातेदारांची सळो की पळो अशी अवस्था झाली होती. यासाठी भयभीत झालेल्या खातेदारांकडून हे निर्बंध लवकरात लवकर हटविण्यात यावे अशी मागणी होती. आजपासून ही बँक पूर्ववत सुरु होणार असून केवळ 50,000 रुपये इतकी काढण्यात येणा-या रकमेवरील निर्बंधही हटविण्यात आले आहेत.
ANI चे ट्विट:
हेदेखील वाचा- Yes Bank खातेदारांची बँक, एटीएम कडे धाव; मात्र ATM मध्ये खडखडाट
रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यानंतर नेट बँकिंग, मोबाईल अॅप, डेबिट-क्रेडीट कार्ड, चेक क्लिअरिंग आणि ATM या सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. तसंच मोबाईल, इंटरनेट बँकींग या सेवाही बंद होत्या. गुगलपे, फोनपे यांसारख्या मोबाईल वॉलेट्स मधूनही येस बँकेच्या खातेदारांना आर्थिक व्यवहार करता येत नव्हते. मात्र हळूहळू एक-एक सुविधा पूर्ववत करण्यात आल्या.
आर्थिक संकटात अडकलेल्या येस बँकेला सावरण्यासाठी आयसीआयसी बँक, एक्सिस बँक, एडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक यांनी येस बँकेत एकूण 3,100 कोटी रुपये गुंतवण्याचे जाहीर केले आहे. तसंच स्टेट बँक ऑफ इंडिया येस बँकेत एकूण 7,250 कोटी रुपये गुंतवणार असून एसबीआयकडे बँकेची 49% भागीदारी राहील.