Ramayana: 'रामायण' चित्रपटामध्ये रावणाच्या भूमीकेचे मार्चमध्ये शुटींग; 2026 मध्ये दिवाळीत होतोय चित्रपट प्रदर्शित
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो रामायणाचे शूटिंग करणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण त्यावेळी शूटिंग झाले नव्हते. आता ते मार्चपासून सुरू होणार आहे.
Ramayana: पुढच्या वर्षी 2026 मध्ये अनेक बीग बजट हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ज्यात रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाचा समावेश आहे. हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग 2026 मध्ये दिवाळीत प्रदर्शित होत आहे. दुसरा भाग 2027 मध्ये येत आहे. रणबीर कपूर चित्रपटात श्री रामाची भूमिका साकारत आहे. तर साई पल्लवी सीतेची भूमिका साकारत आहे. रावणाच्या भूमीकेत यश दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यश मार्चमध्ये त्याच्या रावणासाठीच्या भूमीकेत चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. 835 कोटींमध्ये हा चित्रपट बनवला जात आहे. (Ramayana: 'रामायण'मध्ये जटायूची भूमिका साकारणार अमिताभ बच्चन, बिग बजेट चित्रपटाला देणार आपला आवाज)
रावणाची भूमिका साकारण्यास उत्सूक
केजीएफ 2 हिट चित्रपटानंतर यश सध्या दुसऱ्या चित्रपटाचे चित्रीकरणही करत आहे. खरंतर, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो रामायणाचे शूटिंग करणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण त्यावेळी शूटिंग झाले नव्हते. आता ते मार्चपासून सुरू होणार आहे. यश स्वतः रावणाची भूमिका साकारण्यास खूप उत्सुक असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले. त्याच्या कारकिर्दीतील ही सर्वात रोमांचक भूमिका असल्याचे त्याने म्हटले आहे.
दरम्यान यश त्याच्या भागाचे चित्रीकरण करताना रणबीर कपूरही त्याला जॉईन करणार असल्याचे म्हटले जात आहे. खरंतर, राम आणि रावणाचे काही सीन्स एकत्र चित्रित केले जाणार आहेत. सध्या रणबीर कपूर त्याच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' चित्रपटावरही काम करत आहे. यशचे एकट्याचे शूटींग संपल्यानंतर रणबीर टीममध्ये सामील होईल. हिंदी आणि साउथ दोन्ही सूपरस्टर्सना समोरासमोर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात यश फक्त कलाकार नाही तर दुहेरी जबाबदारी पार पाडत आहे. तो चित्रपटाचा सह-निर्माता देखील आहे.
रामायणाच्या सेटवरून फोटो लीक
काही दिवसांपूर्वी रामायण चित्रपटाच्या सेटवरून रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांचे फोटो लीक झाले होते. त्याआधीही अनेक फोटो लीक झाले होते. त्यानंतर नितीश तिवारी यांनी शूटींग दरम्यान नियम कडक करत. सेटवर नो फोन पॉलिसी लागू केली होती.
(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2025 12:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

