World Youth Skills Day: कौशल्य वाढविणे वेळेनुसार त्यात बदल करणे काळाची गरज- पंतप्रधान नरेंद्र मोदी

आपल्याला प्रत्येक वेळी काहीतरी नवे शिकायला हवे. जे कौशल्य शिकलो आहो त्यात वेळानुसार बदल करायला हवा. प्रत्येकाला आपले कौशल्य विकसित करण्याची संधी मिळायला हवी असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी म्हणाले.

Narendra Modi | (Photo Credits: ANI/Twitter)

स्वत:मध्ये असलेले कौशल्य (Skills) सातत्याने वाढवणे त्यात वेळेनुसार बदल करणे ही काळाची गरज आहे. कौशल्य हीच आजच्या तरुणाईची ताकद आहे. आजच्या तरुणात वेळेनुसार बदलते कौशल्य आत्मसात करण्याची कला आहे. आपल्यातील अनेक युवक नवनवी कौशल्य शिकत आहेत विकसित करत आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देशातील तरुणांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड यूथ स्किल डे (World Youth Skills Day) निमित्त देशभरातील तरुणांना संबोधित केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तरुणांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आजचा दिवस 21 व्या शतकातील तरुणांना समर्पीत आहे.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोरोना व्हायरस संकटामध्ये लोक विचारतात की आजच्याया कठीण काळात पुढे कसे जायचे? या लोकांना माझा एकच मंत्र आहे आपण आपले कौशल्य विकसित करा. आपल्याला प्रत्येक वेळी काहीतरी नवे शिकायला हवे. जे कौशल्य शिकलो आहो त्यात वेळानुसार बदल करायला हवा. प्रत्येकाला आपले कौशल्य विकसित करण्याची संधी मिळायला हवी असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Maan Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैला 'मन की बात' च्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद)

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, वेळेनुसार कौशल्यात बदल केला नाही तर आयुष्य ठप्प होऊ शकते. मी ओळखत असलेल्या एका गृहस्थांची मला या वेळी आठवण येते. ते अधिक शिकले नव्हते परंतू, त्यांचे हस्ताक्षर अत्यंत सुंदर होते. काळासोबत त्यांनी त्यात बदल केला. त्यांचे काम पाहून लोकांनी त्यांना लिखाणाच्या कामासाठी बोलावणे सुरु केले. प्रत्येकात एक स्वत:ची अशी वेगळी क्षमता असते. जी इतरांपेक्षा वेगळी असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेली स्किल इंडिया मिशनला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त अनेक विषयांवर कौशल्य विकास मंत्रालयाकडून डिजिटल कॉन्क्लेवचे आयोजन करण्यात आले आहे.