Work From Home: ऑफिसात पुन्हा एकदा रुजू होण्याची 75 टक्के लोकांची इच्छा, सर्वेमध्ये सांगितली 'ही' बाब
अशातच काही कंपन्यांनी कायमचे वर्क फ्रॉम होमची सुविधा सुद्धा दिली आहे. लोकांना वर्क फ्रॉम होम करुन गेली दीड वर्ष झाली आहेत.
Work From Home: कोरोना व्हायरसच्या महासंकटामुळे अद्याप ही घरातून बहुतांश लोकांना काम करावे लागत आह. अशातच काही कंपन्यांनी कायमचे वर्क फ्रॉम होमची सुविधा सुद्धा दिली आहे. लोकांना वर्क फ्रॉम होम करुन गेली दीड वर्ष झाली आहेत. परंतु आता काही नागरिकांना वर्क फ्रॉम ऐवजी पुन्हा एकदा ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याची इच्छा आहे. हा खुलासा नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेमध्ये करण्यात आला आहे. JJL यांच्या द्वारे करण्यात आलेल्या सर्वेनुसार 75 टक्के लोकांना आता ऑफिसात जाऊन काम करावेसे वाटत आहे. त्याचसोबत त्यांनी असे म्हटले की, कंपन्यांनी घर किंवा ऑफिस या दोन्हीच्या माध्यमातून काम करावे.
या सर्वेतून असे समोर येते की, असा लोकांच्या संख्येत घट झाली आहे जे असे मानात घरातून केल्यामुळे उत्तम गोष्टी होऊ शकतात. त्याचसोबत लोकांनी असे ही म्हटले , कंपनीची जबाबदारी आहे ते आपल्या कर्मचाऱ्यांना एक सुरक्षित वातावरण देईल. त्यामुळे अधिक उत्तम पद्धतीने कर्मचारी काम करु शकतील.(India Unemployment: कोरोना संकटामुळे देशातील बेरोजगारी वाढली, ऑगस्ट महिन्यात तब्बल 15 लाखांहून अधिक लोकांच्या गेल्या नोकऱ्या)
दरम्यान, गेल्या वर्षात झालेल्या सर्वेनुसार 52 टक्के लोकांनी मानले की, त्यांना ऑफिसात जाऊन काम करायचे आहे. मात्र या वर्षात करण्यात आलेल्या सर्वेत हा आकडा 75 टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्यावर्षात 92 टक्के लोकांनी मानले होते की, त्यांना घर किंवा ऑफिस मधून काम करण्याचा पर्याय दिला पाहिजे. तर यंदाच्या सर्वेत 89 टक्के लोकांना असे वाटते.(How to File ITR For FY 2020-21: यंदा 30 सप्टेंबर पूर्वी incometax.gov.in वर ई फाईलिंग कसं कराल?)
या व्यतिरिक्त 62 टक्के लोकांना घर आणि ऑफिस सोडून तिसऱ्या जागी काम करण्याची इच्छा वाटते. त्याचसोबत 91 टक्के लोकांनी मानले की, त्यांना त्यांच्या वेळेनुसार काम करु शकतात. 86 टक्के लोकांना आठवड्यातून चार दिवस काम करण्याची मागणी केली आहे.