'रोना-धोना बंद करून दिवसाचे 18 तास काम करा'; CEO Shantanu Deshpande चा फ्रेशर्सना सल्ला, सोशल मिडियावर ट्रोल

चांगले खा, तंदुरुस्त राहा. पण किमान 4 ते 5 वर्षे दररोज 18 तास काम करा.'

CEO Shantanu Deshpande (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगभरातील बहुतेक देशांतील कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी चार दिवसांचा आठवडा सुरु करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्याचवेळी एका टॉप भारतीय कंपनीच्या सीईओच्या सोशल मीडिया पोस्टने नवा वाद सुरू केला आहे. लोकप्रिय अशा बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे (Bombay Shaving Company) संस्थापक आणि सीईओ शंतनू देशपांडे (Shantanu Deshpande) यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये तरुण व्यावसायिकांना त्यांच्या कामासाठी दिवसाचे किमान 18 तास समर्पित करण्याचा सल्ला दिला आहे. फ्रेशर्सनी 4-5 वर्षे अशा प्रकारे काम करायला हवे असे त्यांचे म्हणणे आहे.

शंतनू देशपांडे यांनी कर्मचार्‍यांना काम आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, दिवसातील 18 तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. देशपांडे यांनी मंगळवारी ही पोस्ट केली होती.

देशपांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे- ‘जेव्हा तुम्ही 22 वर्षांचे असता आणि नोकरीमध्ये नवीन सुरुवात केली असेल, तेव्हा कामामध्ये स्वतःला झोकून द्या. चांगले खा, तंदुरुस्त राहा. पण किमान 4 ते 5 वर्षे दररोज 18 तास काम करा. अनेक तरुण मुले काम आणि वैयक्तिक आयुष्य यांमध्ये समतोल राखणे महत्वाचे असल्याचे मानतात, मात्र इतक्या लवकर ते शक्य नाही.’

ते पुढे म्हणतात, ‘तुमच्या करिअरच्या सुरुवातीपासून 5 वर्षांत तुम्ही जे काही मिळवता ते कायम तुमच्यासोबत राहते. रडणे थांबवा, आव्हान म्हणून गोष्टी स्वीकारा आणि कठोर व्हा.’ देशपांडे यांच्या या पोस्टनंतर त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. एका युजरने लिहिले की, 'अशा लोकांमुळेच आम्ही गुलामांची पुढची पिढी तयार करत आहोत, जी शंतनू देशपांडे सारख्या लोकांना श्रीमंत बनवेल. कर्मचार्‍यांचे शोषण करणार्‍या विषारी कार्यसंस्कृतीला आपण अलविदा करण्याची वेळ आता आली आहे.’ (हेही वाचा: Developed Country: 'भारत 2047 पर्यंत विकसित देश होईल'; PM Narendra Modi यांचा संकल्प)

आपल्या पोस्टवरून वाद वाढत असल्याचे पाहून शंतनू देशपांडे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणतात, ‘दिवसाचे 18 तास काम करण्याचा सल्ला शाब्दिक घेऊ नये. ही एक उपमा होती, ज्याचा अर्थ आपल्या कामाप्रती समर्पण असा होतो. तसेच बॉम्बे शेव्हिंग कंपनीमध्ये कसे काम चालते हे पाहायचे असल्यास कधीही ऑफिसला या किंवा आमच्या कर्मचाऱ्याशी बोला.’



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif