लज्जास्पद! चिमुरडींच्या गुप्तांगात पेन्सिल टाकून लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षिकेला अटक

यापेक्षा सर्वात घृणास्पद गोष्ट म्हणजे या शिक्षिकेने या 2 चिमुकलींच्या गुप्तांगात पेन्सिल टाकून त्यांचे शारीरिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना इंदोर (Indore) परिसरात घडली आहे.

शिकवणी घेणा-या एका महिला शिक्षिकेने 2 लहान विद्यार्थिंनींसोबत लैगिंक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यापेक्षा सर्वात घृणास्पद गोष्ट म्हणजे या शिक्षिकेने या 2 चिमुकलींच्या गुप्तांगात पेन्सिल टाकून त्यांचे शारीरिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. इतकंच नव्हे तर या शिक्षिकेने या लैंगिक छळाचा व्हिडिओ आपल्या प्रियकरालाही पाठवला. पोलिसांनी शिक्षिकेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

या शिक्षिकेने ज्या चिमुकलींवर अत्याचार केले त्यातील एकीचे वय 6 वर्ष तर दुसरीचे वय 3 वर्ष आहे. या दोन्ही मुली सख्ख्या बहिणी आहेत. आरोपी शिक्षिकेकडे या लहानग्या मुली शिकवणीसाठी जात होत्या. मंगळवारी सायंकाळी दोन्ही बहिणी घरी आल्यानंतर लहान मुलीने आईकडे गुप्तांगात दुखत असल्याची तक्रार केली. गुप्तांगात जखम झाल्याचे पाहून आईने याबाबत विचारणा केली. त्यावेळेस चिमुकलीने आईला 'टीचर दीदी'ने केलेला प्रकार सांगितला. आईने मोठ्या मुलीलादेखील याबाबत विचारणा केली. तेव्हा मोठ्या मुलीनेदेखील आपल्यासोबत हाच प्रकार झाला असल्याचे सांगितले.

हेदेखील वाचा- चंद्रपूर: मानवी तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस; 11 व्या वर्षी अपहरण करून, नऊ वर्षांत 7 वेळा विक्री झालेल्या तरुणीची सुटका

आरोपी शिक्षिकेने मुलींचा लैंगिक छळ केला. छळ सुरू असताना वेदना होत असल्याचे पीडित मुलींनी सांगितल्यानंतर आरोपीने त्यांना कपडे घातले आणि पुन्हा एकदा शिकवण्यास सुरूवात केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या धक्कादायक प्रकार ऐकून या मुलींच्या घरच्यांना धक्काच बसला. त्यांनी शेजारी राहणा-या या शिक्षिकेला मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून तिची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.