Baby Boy Born Inside IndiGo Flight: महिला विमानात बाळंत, दिल्ली-बंगळुरु प्रवासादरम्यानची घटना
सुरुवातीच्या काळात हे एक आव्हाना आणि आश्चर्य म्हणून याकडे पाहिले जात असे.
हवाई प्रवासादरम्यान एका महिला विमानातच बाळंत झाली. ही घटना इंडिगो (IndiGo) कंपनीच्या विमानात घडली. इंडिगो कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. कंपनाने म्हटले आहे की, 6E 122 हे विमान ( IndiGo flight) दिल्ली येथून बंगळुरुकडे (Delhi-Bengaluru Flight) निघाले होते. दरम्यान, एका महिलेने बाळाला विमानातच जन्म (Baby Boy Born Inside IndiGo flight) दिला. बाळ आणि बाळंतीन दोघेही सुरक्षीत आहेत. त्यांची प्रकृती चांगली आहे. हे विमान बुधवारी सायंकाळी 7.40 वाजता बंगळुरु विमानतळावर उतरले.
प्राप्त माहितीनुसार, इंडिगो कंपनीच्या 6E 122 विमानाने दिल्ली विमानतळाहून बंगळुरुच्या दिशेने झेप घेतली. हे विमान बंगळुरुकडे निघाले होते. विमान आकाशात असतानाच एका महिलेला बाळंतकळा सुरु झाल्या. थोड्या वेळाने महिला बाळंत झाली. या महिलेने एका मुदतपूर्व (प्रीमॅच्यूअर) बालकाला जन्म दिला. (हेही वाचा, हवाई प्रवासादरम्यान महिला बाळंत, जकार्ताला जाणाऱ्या विमानाचे मुंबईत एमरजन्सी लॅंडीग)
दरम्यान, या घटनेबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. उड्डाण व्यवसायातील सूत्राच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पीटिआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, दिल्ली-बंगळुरु दरम्यान हवाई प्रवास करत असताना 6E 122 या विमानात महिला बाळंत झाली. या विमानाने सायंकाळी 7.30 वाजता बंगळुरु विमानतळावर उतरले. विमानतळावर विमान उतरताच एक विशेष पथक विमानाजवळ पोहोचले. त्यांनी बाळ आणि बाळाच्या आईला सुरक्षीतपणे खाली उतरवले. सद्या दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे इंडिगोने म्हटले आहे.
विमानात महिला बाळंत होण्याची ही पहिलीच घटना नाही. याही आधी अनेक वेळा अनेक ठिकाणी महिलांनी बाळांना विमानात जन्म दिला आहे. दरम्यान, अशा वेळी काही घटनांमध्ये विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे. तर काही ठिकाणी निश्चित ठिकाणी विमानांचे लँडींग करण्यत आले आहे. विमानात महिला बाळंत होणे ही आता एक सामनान्य बाब मानली जाते. सुरुवातीच्या काळात हे एक आव्हाना आणि आश्चर्य म्हणून याकडे पाहिले जात असे.