Woman Dies in Tiger Attack: वायनाडमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; कॉफी बीन्स तोडणारी महिला ठार

वायनाडमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. कॉफी बीन्स तोडणारी महिला ठार झाली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी अधिकारी पोहोचले आहेत.

Tiger | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Woman Dies in Tiger Attack: केरळमधील वायनाड(Wayanad) जिल्ह्यात वाघाने जंगलात एका महिलेवर हल्ला करून तिला ठार मारल्याची घटना समोर आली (Woman Killed  in Tiger Attack)आहे. ही घटना मंथवाडी भागात घडली, यात 48 वर्षीय राधा नावाच्या महलेचा मृत्यू झाला. कॉफीचे बीन्स तोडण्यासाठी त्या जंगलात आल्या होत्या. राधा या वन विभागातील एका कर्चाऱ्याच्या पत्नी आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Tiger Johnny Travels 300 km in Search of Mate: जोडीदाराच्या शोधात जॉनी वाघाचा 300 किमीचा प्रवास; महाराष्ट्रातून थेट तेलंगणात पोहोचला)

घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. घटनेनंतर वन विभागाच्या पथकाने लोकांना वाघापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही घटना जंगलालगतच्या एका परिसरात घडली, जिथे वाघांची हालचाल अनेकदा दिसून आल्या आहेत. वाघाच्या हल्ल्यामुळे राधाचा मृत्यू झाल्याची पुष्टी वन विभागाने केली आहे. परंतु हल्ला करणारा वाघ पुन्हा जंगलात गेला आहे की? जवळच लपला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक लोकांना सतर्क राहण्याचे आणि जंगलाजवळ न जाण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

11 लाख रुपये भरपाईची घोषणा

या घटनेनंतर, अनुसूचित जाती आणि जमाती विकास मंत्री ओ.आर. केळू घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांशी संपर्क साधला. वाघाला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावला जात आहे. मृत महिलेच्या कुटुंबाला सरकार 11 लाख रुपयांची आर्थिक मदत देईल अशी घोषणाही मंत्र्यांनी केली आहे.

वाघाला पकडले जाईल किंवा गोळी मारून ठार केले जाईल

वनमंत्री ए.के. ससींद्रन म्हणाले की, हल्ला जंगलाच्या आत झाला असला तरी, गरज पडल्यास वाघाला गोळ्या घालत्या जातील. केंद्र सरकारने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत जारी केलेल्या मानक कार्यपद्धती (एसओपी) नुसार वाघाला गोळ्या घालण्याचे आदेश मुख्य वन्यजीव वॉर्डनने जारी केले आहेत. आदेशानुसार, वाघाला एकतर पकडले जाईल किंवा गोळी मारून ठआक केले जाईल.

वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांनीही या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, "राधा यांच्या मृत्यूमुळे दुःख झाले आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करते. वन्यजीवांच्या अतिक्रमणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची तातडीने गरज आहे."

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now