Woman Delivers Baby On Road: रुग्णवाहीकेतील इंधन संपले, तेलंगणात महिलेची रस्त्यावरच प्रसुती

तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातही त्याचा दाखला मिळाला आहे. गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात घेऊन जाताना रुगवाहीकेचे इंथन संपले (Ambulance Runs Out of Fuel). परिणामी महिलेची प्रसूती रस्त्यावरच (Woman Delivers Baby On Road) झाली.

Road | Representational image (Photo Credits: pxhere)

Telangana News: स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करता करता भारत चंद्रावर पोहोचला. जगभरातील मोजक्याच देशांना मिळालेले यश देश म्हणून भारताच्याही वाट्याला आले. मात्र, हे यश, महासत्तेचे स्वप्न आणि 'सबका साथ सबका विकास' किती स्वप्नरंजन आहे याची पोलखोल दररोज होत आहे. तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातही त्याचा दाखला मिळाला आहे. गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात घेऊन जाताना रुगवाहीकेचे इंथन संपले (Ambulance Runs Out of Fuel). परिणामी महिलेची प्रसूती रस्त्यावरच (Woman Delivers Baby On Road) झाली.

पेंबी मंडलच्या अत्यंत दूर्गम म्हणून ओळकल्या जाणाऱ्या थुलासीपेठ गावातील आदिवासी पाड्यातील गंगामणी नामक महिला रस्ता नसल्याने आगोदरच चार तास एकाच ठिकाणी अडकून पडली होती. त्यातून तिला रुग्णवाहीका कशीबशी मिळाली. मात्र तिथेही तिची अडथळ्यांची शर्यत थांबली नाही. हे आजच्या भारतातील पूर्वंपार चालत आलेले धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा पुढे आले आहे.

गगामणीच्या पतीने घडल्या प्रकाराबद्दल माहिती देताना प्रसारमाध्यमांना सांगितले की, पत्नीला (गंगामणी) जेव्हा प्रसूती वेदना सुरु झाल्या तेव्हा रुग्णवाहिका बोलाविण्यात आली. मात्र, गावापर्यंत पोहोचण्यास रस्ताच नसल्याने रुग्णवाहीका पोहोचेपर्यंत बराच उशीर झाला होता. अखेर गावकऱ्यांच्या मदतीने पत्नीला घेऊन आम्ही सगळ्यांनी दोठी ओढा ओलांडून कसेबसे मुख्य रस्त्याला उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचलो. पण, रुग्णवाहिकेचे इंधन संपल्याने त्याचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही. पत्नीची प्रसूती रस्त्यावरच झाली. धक्कादायक म्हणजे आम्ही Google Pay करुन इंधनासाठी 500 रुपये पाठवले. त्यानंतर रुग्णवाहिका आली आणि बाळाची नाळ कापण्यात आली. आता बाळ आणि बाळंतीन दोघेही सुखरुप आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

निर्मल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वरुण रेड्डी यांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, बाळाच्या प्रसूतीची अपेक्षीत तारीख 22 सप्टेंबर होती. बाळंत महिला राहात असलेला भाग अतिशय दुर्मिळ आहे. या भागात दळणवळणासाठी रस्ता नाही. त्यामुळे साधनेही दुर्मिळ आहेत. त्यामुळे सामान्यात: या भागातील महिलांना आम्ही वेळेच्या आधीच रुग्णालयात दाखल करतो. मात्र, या प्रकरणात महिलेला आगोदरच प्रसूती वेदना सुरु झाल्याने तिथेच प्रसूती करणयाचा निर्णय घेण्यात आला. इंधन संपल्याने रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब झाल्याचे वृत्त जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावले.