Winter Session 2022 Of Parliament: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत महाराष्ट्र-कर्नाटक वादावरून वातावरण तापलं; सुप्रिया सुळेंनी भाजपाला सुनावलं

तसेच हा संसदेत बोलण्यासारखा विषय नसल्याचं सांगत रेकॉर्डवर कोणतीही गोष्ट घेण्यास नकार दिला.

Supriya Sule | (Photo Credits: ANI)

संसदेचं आजपासून हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून (Maharashtra-Karnataka Border Row) गदारोळ पहायला मिळाला आहे. लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सीमावादाचा मुद्दा उचलून धरत भाजपाला सुनावलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगली मधील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा सांगितला आणि पुढे बघता बघता वाद वाढत गेला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेमध्ये देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपलं मत मांडावं अशी मागणी केली. दरम्यान सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर कर्नाटकचे भाजपा खासदार शिवकुमार उदासी (Shivkumar Chanabasappa Udasi) यांनी उत्तर देताना 'हा त्यांचा लिंगो कल्चरल सिंड्रोम असल्याचं सांगत महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते नेहमीच अशा प्रकारे बोलतात, वागतात. सत्ता गेल्यापासून ते अशाप्रकारे वागत असल्याचंही म्हटलं आहे.

दरम्यान 6 डिसेंबर दिवशी महाराष्ट्राचे दोन मंत्री कर्नाटकात जाणार होते. तसे कळवण्यात आल्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्र्यांचे कर्नाटक येणं हे कायदा व सुव्यवस्था बिघडवणारं ठरू शकतं असं म्हटल्याने महाराष्ट्राच्या मंत्र्यांनीही तेथे जाणं टाळलं. पण त्यानंतर काल बेळगावात दगडफेक झाली. हा प्रकार म्हणजे हद्दच झाली आणि कर्नाटक मंत्र्यमंत्री बेताल वक्तव्य करत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arvind Sawant (@agsawant)

लोकसभेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून वातावरण तापल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा दोन राज्यांमधील प्रश्न असून केंद्र सरकार मध्ये काय करू शकत नाही. तसेच हा संसदेत बोलण्यासारखा विषय नसल्याचं सांगत रेकॉर्डवर कोणतीही गोष्ट घेण्यास नकार दिला.