Air Force Day 2019: विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि मिंटी अग्रवाल यांच्या युनिटचा IAF कडून होणार विशेष सन्मान; बालाकोट एअर स्ट्राईक दरम्यान दाखवलेल्या शौर्यासाठी कौतुकाची थाप
हा सन्मान कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन सतिश पवार (Group Captain Satish Pawar) स्विकारणार आहेत.
भारतीय हवाई दलाकडून करण्यात आलेल्या बालाकोट एअर स्ट्राईक दरम्यान जगाचं लक्ष वेधणार्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शिरपेचात अजून एक तुरा खोवला आहे. आज (6 ऑक्टोबर) देण्यात आलेल्या माहितीनुसार, विंग कमांडर सोबत 51 स्क्वाड्रनचा, सोबतच मिंटी अग्रवाल यांच्या युनिट 601 सिग्नल युनिटचादेखील गौरव होणार आहे. 27 फेब्रुवारी 2019 दिवशी पाकिस्तानी हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानी एफ-16 हे लढाऊ विमान पाडताना दाखवलेल्या शौर्याचा सन्मान होणार आहे. हा सन्मान कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन सतिश पवार (Group Captain Satish Pawar) स्विकारणार आहेत.
काही दिवसांपूर्वी भारतीय हवाई दलाकडून बालाकोट एअर स्ट्राईकचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दहशतवादी तळं उद्ध्वस्त केल्याचे पुरावे आहेत. बालाकोट एअरस्ट्राईक' चा व्हिडिओ जारी; पहा Indian Air Force ने कसा केला आतंकवाद्यांचा खात्मा.
ANI Tweet
पाकिस्तानच्या बालाकोट मध्ये भारतीय वायुसेने केलेल्या एअर स्ट्राईकला 'ऑपरेशन बंदर' असं म्हटलं होतं. पाकव्याप्त कश्मीर मध्ये घुसून वायुसेनेने विंग कमांडर अमित रंजन, स्क्वाड्रन लीडर राहुल बसोया, पंकज भुजडे, बीकेएन रेड्डी, शशांक सिंह यांनी आंतकवाद्यांना कंठस्नान घातले.
2 सप्टेंबर दिवशी अभिनंदन वर्थमान यांनी एअर फोर्स प्रमुख बी.एस.धनोआ (Air Chief Marshal BS Dhanoa) यांच्यासोबत मिग-21 विमानामधून उड्डाण केले. पंजाब येथील पठाणकोट एअरबेसवरून त्यांनी हे उड्डाण केले आहे. सध्या अभिनंदन यांना राजस्थानमधील आयएएफच्या तळावर तैनात करण्यात आले आहे.