Wife Swapping Case In Bengaluru: मित्रासोबत पत्नीची आदलाबदली, वाईफ स्वॅपींग प्रकरणी बंगळुरु येथील व्यक्तीवर गुन्हा दाखल
सदर व्यक्तीने आपल्या महिला जोडीदारावर (जी त्याची पत्नी आहे) मित्रासोबत संबंध ठेवण्यासाठी बळजबरी ( Wife Swapping) केली.
बंगळुरु येथील एका व्यक्तीवर मित्रासोबत पत्नीची आदलाबदल (Wife Swapping Case In Bengaluru) केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. सदर व्यक्तीने आपल्या महिला जोडीदारावर (जी त्याची पत्नी आहे) मित्रासोबत संबंध ठेवण्यासाठी बळजबरी ( Wife Swapping) केली. पीडितेने 13 डिसेंबर रोजी दिलेल्या औपचारिक तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीत केवळ मानसिक छळच नाही तर जबरदस्तीने पत्नीच्या अदलाबदलीशी संबंधित शारीरिक अत्याचाराचा आरोप केला आहे. बसवनगुडी महिला पोलिसांनी एफआयआर दाखल करून तत्परतेने कारवाई प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मित्रासोबत रात्र घालवण्यासाठी तिला जबरदस्ती:
पीडितेने पोलिसांना सांगितले की, बसवनगुडी येथे राहणारा तिचा नवरा त्याच्या एका मित्रासोबत रात्र घालवण्यासाठी तिला जबरदस्ती करत होता. आरोपीचा पीडितेसोबत एक वर्षापूर्वी विवाह झाला आहे. तेव्हापासून आरोपी सातत्याने तिचा छळ करतो आहे. तिच्या कुटुंबाचे कर्ज फेडण्यासाठी 10 लाख रुपये हुंडा आणण्यासाठी तिच्यावर दबाव आणतआहे. तिच्या भावाने आधीच 2 लाख रुपये दिले असूनही, आरोपीने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच ठेवला आणि अतिरिक्त 8 लाख रुपयांची मागणी केली, असा आरोप पीडितेने तक्रारीद्वारे केला आहे.
शारीरिक शोषणाचे आरोप:
आर्थिक दबावाव्यतिरिक्त, आरोपींनी पीडितेला बेल्टने मारहाण करण्यासह शारीरिक शोषण केले. आरोपीने तिचे अश्लील व्हिडिओ दाखवण्यास सुरुवात केली आणि तिच्या मित्रांसोबत रात्र घालवण्याचा आग्रह धरला. ज्यामुळे आपल्या मनात लज्जा उत्पन्न झाली. आपण मनातून अर्धमेले झालो. आरोपीला त्याच्या कृत्यास नकार दिला. त्यातून आरोपीने तिच्यावर आणखी दबाव टाकला आणि शारीरिक अत्याचार केला.
एक्सप पोस्ट
हुंडाबळीची तक्रार:
पीडितेने आरोपीच्या कुटुंबीयांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण घरगुती अत्याचार आणि बळजबरी वर्तनाच्या चिंताजनक बाबींवर प्रकाश टाकते. पीडितेला न्याय देण्यासाठी तसेच प्रकरणातील वास्तवता तपासण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आहे. तपासाअंती सर्व बाबी स्पष्ट होतील असे पोलिसांी म्हटले आहे.