धक्कादायक! भाडेकरुच्या पत्नीशी समलिंगी संबंध ठेवता यावे म्हणून घरमालकिणीने केली नव-याची हत्या

एका घरमालकिणीने आपल्या भाडेकरुच्या पत्नीशी समलिंगी संबंध ठेवता यावे म्हणून आपल्याच नव-याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

धक्कादायक! भाडेकरुच्या पत्नीशी समलिंगी संबंध ठेवता यावे म्हणून घरमालकिणीने केली नव-याची हत्या
Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

सध्या शरीरसुखाची गरज आणि वासना या गोष्टी समाजात इतक्या थराला जाऊन पोहोचल्या आहेत ज्यात माणसं आपली रक्ताची नाती देखील विसरुन चालली आहेत. मग जिथे रक्ताचं नातं डोळ्यासमोर दिसतं नाही तिथे सात जन्मांच्या गाठीत बांधलं गेलेले पती-पत्नीचे नाते फिकेच पडेल. माणुसकीला काळिमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये (AliGarh)घडलीय. एका घरमालकिणीने आपल्या भाडेकरुच्या पत्नीशी समलिंगी संबंध ठेवता यावे म्हणून आपल्याच नव-याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. TV9 ने दिलेल्या वृत्तानुसार, भूरीसिंग असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भाडेकरु आणि घरमालकीणीने मिळून आपल्या भावाच्या हत्येचा कट केल्याचा आरोप भूरीसिंगच्या भावाने केला आहे.

अलिगढमधील कुंवरनगर भागात राहणाऱ्या भूरीसिंग गोस्वामी यांचा मृतदेह होळीच्या रात्री एका नाल्यात सापडला होता. मृतदेहाचे हात-पाय दोरीने बांधलेले होते. पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं असता, त्याचा गळा दाबून खून केल्याची माहिती समोर आली. मुंबई: चारित्र्याच्या संशयावरुन माथेफिरु पतीने पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या

पोलिसांनी भूरीसिंगची पत्नी रूबीकडे याबाबत विचारणा केली असता होळीसाठी पैसे घेण्यासाठी बाहेर गेले आहेत असे सांगितले. मात्र दुस-या दिवशी मृत भूरीसिंगचा भाऊ किशनने पोलीस ठाण्यात आपल्या भावाची पत्नी रुबी, त्यांचा भाडेकरु हरिओम डब्बू आणि त्याची पत्नी रजनी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलीस चौकशीत रुबीचे भाडेकरु रजनीशी समलैंगिक संबंध होते. भूरीसिंग यांना या संबंधांविषयी समजताच त्यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे रुबी आणि रजनी यांनी होळीच्या रात्री त्याची हत्या करण्याची योजना आखली.

याप्रकरणी दोन्ही आरोपी महिलांना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2020 04:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).