IPL Auction 2025 Live

मादी शर्मा कोण आहेत? European Union खासदारांचा कश्मीर दौरा आयोजित केल्याने होतीय जोरदार चर्चा

हा प्रश्न उपस्थित करण्यामागचे कारण म्हणजे यूरोपियन यूनियन खासदारांचा जम्मू-कश्मीर दौऱ्याच्या त्या आयोजक होत्या. त्यामुळे सहाजिकच त्यांच्याबात सोशल मीडिया आणि प्रसाराध्यमांतून तसेच, सर्वसामान्य नागरिकांतून उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

Madi Sharma | (Photo Credit: YouTube)

यूरोपियन यूनियन (European Union) खासदारांचा जम्मू-कश्मीर दौरा सध्या प्रसारमाध्यमांतून जोरदार चर्चेत आहे. योरोपियन यूनियनच्या 27 खासदारांच्या एका गटाने जम्मू-कश्मीर दौरा केला आणि या चर्चेला सुरुवात झाली. दरम्यान, या चर्चेसोबतच आणखीही एका नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. ही चर्चा म्हणजे मादी शर्मा (Madi Sharma). प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियातूनही मादी शर्मा कोण (Who is Madi Sharma) आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा प्रश्न उपस्थित करण्यामागचे कारण म्हणजे यूरोपियन यूनियन खासदारांचा जम्मू-कश्मीर दौऱ्याच्या त्या आयोजक होत्या. त्यामुळे सहाजिकच त्यांच्याबात सोशल मीडिया आणि प्रसाराध्यमांतून तसेच, सर्वसामान्य नागरिकांतून उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार मादी शर्मा या मोदी ग्रूपच्या प्रमुख आहेत. त्यांनी यूरोपियन खासदारांना काश्मीर दौरा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून आणण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन केले. मादी शर्मा याचां मादी ग्रुप हा आंतरराष्ट्रीय प्रायव्हेट सेक्ट आणि एनजीओचे एक नेटवर्क असल्याचे सांगितले जाते.

एनडीटीव्ही आणि टाइम्स ऑफ इंडिया यांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मादी शर्मा यांनी 7 ऑक्टोबर 2019 या दिवशी यूरोपियन खासदारांना एक ईमेल पाठवत काश्मीर दौऱ्याबाबत कळवले. तसेच, 28 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हीआयपी मीटिंग आणि 29 ऑक्टोबर रोजी काश्मीर दौरा असा कार्यक्रम ठरवला होता. या दौऱ्यानंतर एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्याचा उल्लेखही या कार्यक्रमात होता. भारतीय प्रसारसमाध्यमांतून या दौऱ्याबाबत जोरदार चर्चा सुरु झाल्यानंतर मादी शर्मा यांच्याबाबत सर्वसामान्यांतून उत्सुकता वाढली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मादी शर्मा एक NGO विमिंज इकनॉमिक अॅण्ड सोशल थिंक टँक (WESTT) चालवतात. मादी शर्मा यांच्या ट्विटर हँडलवर उपलब्ध माहितीनुसार त्या स्वत:ची ओळख इंटरनॅशनल बिझनेस ब्रोकर, एज्युकेशनल इंटरप्रेणर अॅण्ड स्पीकर (Educational Entrepreneur and Speaker) अशी करुन देतात. यूरोपियन खासदारांनाही त्यांनी निमंत्रण दिले होते.

यूरोपियन युनियन खादरारांच्या एका चमूची पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत भेट झाली. नवी दिल्ली येथे डोभालद्वारा आयोजित लंचदरम्यान काश्मीरच्या काही लोकाशाही त्यांची भेट घडवून आणण्यात आली. तसेच, श्रीनगरमधील काही स्थानिक लोकांशीही त्यांची भेट झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला युरोपिन संसदेच्या सदस्यांची टीम, 29 ऑक्टोबरला जम्मू-कश्मीर दौरा करणार)

मादी शर्मा या इकनॉमिक अॅण्ड सोशल कमिटी सदस्या आहेत. इकनॉमिक अॅण्ड सोशल कमिटी ही यूरोपियन यूनियनची सल्लागार संस्था आहे. मादीने कलम 370 वर एक लेखही लिहीला होता. हा लेख EP मासिकात मध्ये छापून आला होता. लेखाचे शिर्षक होते 'कलम 370 रद्द करणे विजय आणि कश्मीरी महिलांसाठी आव्हान का आहे'. EP हे मासिक यूरोपियन यूनियनशी संबधीत असल्याचे सांगितले जाते.

मादी शर्मा यांच्या वेबसाइटवर असलेल्या माहितीनुसार WESTT महिलांचा एक प्रमुख थिंक टँक आहे. जो महिलांचा आवाज वैश्विक पातवळीवर पोहोचवतो. आर्थिक, पर्यावरणी आणि महिलांच्या सामाजिक विकासावर प्रकाश टाकतो. यात लिहिले आहे की, राजकीय स्तरावर अनेक प्रकरणांमध्ये जागृकता निर्माण करणे आणि त्यासाठी लॉबिंग करण्यासाठीही WESTT काम करते. मात्र, त्याचा व्यावासायीक हेतू नसतो, असेही या वेबसाईटवर म्हटले आहे.