PM Kisan 19th Instalment Date: शेतकर्यांना कधी मिळणार पीएम किसना योजना चा 19 वा हफ्ता?
5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता जारी केला होता.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ( Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) किंवा पीएम किसान योजना (PM Kisan Yojna) चे लाभार्थी सध्या त्यांच्या 19व्या हप्त्याच्या प्रतिक्षेमध्ये आहेत. मोदी सरकार कडून पीएम किसान योजना अंतर्गत शेतकर्यांना मदतीचा हात दिला जातो. योजनेनुसार, प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येकी 2,000 रूपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रूपये मिळतात. विशेष म्हणजे, 2,000 रूपयांचे हप्ते वर्षातून तीनदा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातात. या योजनेंतर्गत आतापर्यंत 18 व्या हप्त्यापर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत.
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता कधी?
सध्या शेतकरी 19 व्या हफ्त्याच्या प्रतिक्षेमध्ये आहेत. न्यूज रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार लवकरच 19 वा हफ्ता देणार आहेत. हा हफ्ता फेब्रुवारी 2025 चा आहे. त्यामुळे न्यूज रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर हा 19 वा हफ्ता देत शेतकर्यांना सरकार कडून न्यू इयर गिफ्ट मिळू शकतं. मात्र अद्याप सरकार कडून 19 व्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.
निधी प्राप्त करण्यासाठी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी स्वतःची नोंदणी करू शकतात.
PM Kisan Yojana साठी स्वतःला रजिस्टर कसं कराल?
- अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्या.
- होम पेज वर 'New Farmer Registration'चा पर्याय निवडा. त्यासाठी तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर, बॅंक अकाऊंट चे तपशील टाकून आवश्यक कागदपत्र अपलोड अरा. यामध्ये तुम्हांला जमीनीच्या मालकीचे पत्र आणि बॅंक पासबूक देखील सादर करावं लागणार आहे.
- तुमचे तपशील पडताळल्यानंतर PM Kisan Samman Nidhi Yojana चे तुम्ही लाभार्थी व्हाल.
5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता जारी केला होता. 18 वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊन 2 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे.