What is Terrorism?: दहशतवाद म्हणजे काय? कारणं, प्रकार आणि जागतिक परिणाम; सविस्तर जाणून घ्या
Causes of Terrorism: दहशतवाद म्हणजे काय? जाणून घ्या दहशतवादाचा अर्थ, प्रमुख कारणं, वेगवेगळे प्रकार आणि जागतिक पातळीवर त्याचे परिणाम.
दहशतवाद (Terrorism) हा जागतिक शांतता (World Peace) आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी (National Security) सर्वात गंभीर धोक्यांपैकी एक आहे. पण दहशतवाद म्हणजे नेमके काय (What is Terrorism) आणि तो जगभरातील देशांवर का परिणाम करत राहतो? त्याचे प्रकार (Types of Terrorism) कोणते? जागतिक शांतता आणि राष्ट्रीय सुरक्षेसमोरील सर्वात मोठा धोका का मानला जातो? याबाबत अनेकांच्या मनात असंख्य प्रश्न असतात. अगदी काल (22 एप्रिल) जम्मू-कश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पुन्हा एकदा दहशतवाद म्हणजे नेमके काय? हा प्रश्न चर्चेत आला आहे.
दहशतवाद म्हणजे काय?
दहशतवाद म्हणजे विशिष्ठ विचारसरणी डोळ्यासमोर ठेऊन राजकीय, धार्मिक किंवा सामाजिक उद्दिष्ट साधण्यासाठी सामान्य नागरिकांवर हिंसक हल्ले करणे. यात हिंसा, भीती आणि दहशतीचा वापर केला जातो. हे कृत्य वैयक्तिक, संघटित गट किंवा काही वेळा राज्य पुरस्कृत संस्थांकडूनही केले जाऊ शकते. ज्याला राज्य, देश, धर्म, प्रदेश अथवा विशिष्ट विचारांच्या सिद्धांताशी जोडले जाऊ शकते. केवळ हिंसक कारवाया किंवा समोरच्याच्या मनात, समाजात, प्रदेशावर भीती, जबरदस्ती किंवा अनैतिक मार्गाने कब्जा मिळविण्यासाठी केलेले कोणतेही कृत्य, खास करुन रक्तरंजीत हिंसा दहशतवाद मानली जाते. आज जगभरात दहशतवाद हा विषय अतिशय गंभीर ठरला आहे. पाठिमागील अनेक वर्षांपासून दहशतवादाच्या नावाखाली जगभरात असंख्य लोक मारले गेले आहेत. ही कृत्ये अनेकदा व्यक्ती, गट किंवा अगदी राज्य-प्रायोजित संघटनांकडून भीती पसरवण्यासाठी, माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी किंवा सरकारांना कृती करण्यास भाग पाडण्यासाठी केली जातात. (हेही वाचा, 'Surgical Strike 3.0': पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू; संतप्त नेटिझन्सनी पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल स्ट्राइकसह कठोर सूड घेण्याची मागणी)
दहशतवादाची मुख्य वैशिष्ट्ये
- हिंसक कृत्ये: दहशतवादात बॉम्बस्फोट, गोळीबार किंवा अपहरण यासारख्या हिंसक कृत्यांचा समावेश असतो.
- नागरिकांना लक्ष्य करणे: बहुतेक दहशतवादी हल्ले जाणूनबुजून निष्पाप/सामान्य लोकांना लक्ष्य करतात.
- राजकीय किंवा धार्मिक हेतू: ही कृत्ये यादृच्छिक नसून बहुतेकदा सार्वजनिक धोरण, धार्मिक श्रद्धा किंवा सामाजिक संरचनांवर प्रभाव पाडण्याच्या हेतूने प्रेरित असतात.
- मानसिक परिणाम: भौतिक नुकसानाव्यतिरिक्त, दहशतवादाचा उद्देश जनतेमध्ये भीती आणि असुरक्षितता निर्माण करणे आहे. (हेही वाचा: Pahalgam Terrorist Attack: 'आम्हाला दोष देऊ नका, आमच्या देशाचा याच्याशी संबंध नाही'; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, संरक्षण मंत्री Khawaja Asif यांचे भारताबाबत विवादित वक्तव्य)
दहशतवादाची प्रमुख कारणे
- राजकीय अत्याचार/ दडपशाही: अनेक प्रदेशांमध्ये, राजकीय स्वातंत्र्याचा अभाव अशांततेला खतपाणी घालतो. जेथे राजकीय स्वातंत्र्य नाही, तेथे असंतोष निर्माण होतो. कधी कधी एका देशातील दडपशाही शेजारच्या राष्ट्रासाठी हानिकारक ठरु शकते.
- धार्मिक कट्टरता: धार्मिक शिकवणींचा चुकीचा अर्थ लावल्याने कट्टरपंथी विचारसरणी निर्माण झाली आहे. त्यातून काही लोक हिंसेकडे वळतात.
- आर्थिक विषमता: गरिबी, बेरोजगारीमुळे तरुण दहशतवादी गटांकडे ओढले जातात.
- परकीय हस्तक्षेप: युद्ध, सैनिकी हस्तक्षेप यामुळेही दहशतवाद वाढू शकतो.
दहशतवादाचे प्रकार
- देशांतर्गत दहशतवाद: देशातील व्यक्ती किंवा गटांकडून नागरिकांवर केले जाणारे हल्ले.
- आंतरराष्ट्रीय दहशतवाद: राष्ट्रीय सीमा ओलांडून नियोजित किंवा अंमलात आणला जातो, ज्यामध्ये अनेकदा परदेशी नागरिकांचा समावेश असतो.
- सायबर दहशतवाद: भीती पसरवण्यासाठी किंवा वीज, बँकिंग किंवा संप्रेषण यासारख्या आवश्यक प्रणालींमध्ये व्यत्यय आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर.
- जैविक दहशतवाद: विषाणू किंवा विषारी पदार्थांसारख्या जैविक घटकांचा वापर लोकांना किंवा समुदायांना हानी पोहोचवण्यासाठी.
दहशतवादाचे परिणाम
- मानवी जीवन: दरवर्षी हजारो निष्पाप लोक दहशतवादामुळे प्राण गमावतात.
- आर्थिक नुकसान: मालमत्तेचं नुकसान आणि गुंतवणुकीचा अभाव यामुळे अर्थव्यवस्था कोलमडते.
- सुरक्षा खर्च: राष्ट्रांना संरक्षण, गुप्तचर आणि देखरेखीसाठी अब्जावधी खर्च करावे लागतात.
- समाजामध्ये भीती आणि अविश्वास निर्माण होतो.
जागतिक स्तरावरील उपाययोजना
दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी विविध देशांनी कडक कायदे, गुप्तचर यंत्रणांमध्ये सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा मार्ग स्वीकारला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, FATF (Financial Action Task Force) आणि Interpol यांसारख्या संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरते. दहशतवाद हा कोणत्याही एक देशापुरता मर्यादित नाही. तो एक जागतिक धोका आहे. त्याच्या मुळाशी जाऊन कारणांची समज आणि जागरूकतेद्वारेच त्याला आळा घालता येईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)