Gold-Silver Rate Today: पहा आजचा सोनं-चांदी खरेदीचा दर किती?
सोन्याचे दर उच्चांकी स्तरापेक्षा 11000 रुपयांनी कमी नोंदवले जात आहेत.
मागील काही दिवसांमध्ये सोनं-चांदीच्या दरामध्ये सतत चढ उतार पहायला मिळाले आहे. यामध्ये आज (11 ऑगस्ट) पुन्हा सोनं-चांदीचे दर कमी झाले आहेत. MCX वर आज सोन्याचे दर 0.13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर चांदीचे दर कमी झाले आहेत. सोन्याचे दर मागील 4 महिन्याच्या निच्चांकी स्तरावर आहेत. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे दर 46,000 रुपये प्रति 10 ग्राम साठी इतके कमी झाले आहेत. हे सोन्याचे दर गेल्या चार महिन्यातील सर्वात कमी स्तरावर आहेत. एमसीएक्सवर गेल्या तीन सत्रात सोन्याचे दर अंदाजे 1.3 टक्क्यांनी कमी झाले आहेत. चांदीचे दरह 1.5 टक्क्यांनी कमी झाले आहेत.
सोन्याच्या खरेदीसाठी सध्या चांगली संधी आहे. सोन्याचे दर उच्चांकी स्तरापेक्षा 11000 रुपयांनी कमी नोंदवले जात आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56200 रुपये प्रति 10 ग्रामवर पोहोचले होते. मात्र आता सोन्याचे दर सराफा बाजारात 45,000 रुपये प्रति तोळा आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करणार्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.
आजचे सोन्याचे दर पहा जीएसटी शिवाय
दरम्यान देशाच्या विविध भागात आणि शहरातही सोन्याचे दर वेगवेगळे असतात. सोन्याच्या दरावर इतर कर आकारले जातात. त्यामुळे वेगवेगळे दर नोंदवले जातात. गेल्या 3 दिवसात महाराष्ट्रात सुवर्ण नगरी ओळखल्या जाणार्या जळगावात चांदीचे दर अंदाजे 4 हजार रुपयांनी तर सोन्याचे दर 1 हजार 200 रुपयांनी कमी झाले आहेत. आज जळगावात सोन्याचे दर 3 टक्के जीएसटीसह 47 हजार 700 रुपये प्रति 10 ग्राम साठी नोंदवण्यात आले आहेत तर चांदीचे दर जीएसटी शिवाय 63 हजार रुपये प्रति किलो आहेत.