Buddhadeb Bhattacharya Passes Away: पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे 80 व्या वर्षी निधन
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ज्योती बसू हे आरोग्याच्या कारणास्तव 2000 साली मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती.
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Budhadev Bhattacharya) यांचे निधन झालं आहे. कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 80 वर्षांचे होते. कोलकातामधील पाम एव्हेन्यू येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 80 वर्षीय भट्टाचार्य गेल्या काही वर्षांपासून ते गंभीर आजाराने त्रस्त होते. आज सकाळी 8.20 मिनिटांनी निधन झाले. ते दीर्घकाळापासून सीओपीडी (क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) आणि वृद्धापकाळाशी संबंधित इतर आजारांनी त्रस्त होते. त्याच्यावर कोलकाता येथील घरी उपचार सुरू होते. भट्टाचार्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीरा आणि मुलगी सुचेतना असा परिवार आहे. (हेही वाचा - भाजप आमदार Amrit Meena यांचे Cardiac Arrest मुळे निधन)
पाहा पोस्ट -
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ज्योती बसू हे आरोग्याच्या कारणास्तव 2000 साली मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. मुख्यमंत्री असताना भट्टाचार्य यांनी डाव्या पक्षांची आघाडी करून 2001 आणि 2006 च्या निवडणुकीत विजय मिळविला होता. भट्टाचार्य प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक जीवनापासून दूर होते. त्यांनी 2015 मध्ये सीपीआय(एम) च्या पॉलिटब्युरो आणि केंद्रीय समितीचा राजीनामा दिला होता.
भट्टाचार्य 2000 ते 2011 पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) च्या पॉलिटब्युरोचे सदस्यही होते. बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म 1 मार्च 1944 रोजी उत्तर कोलकाता येथे झाला. नंतर त्यांनी माकपमध्ये प्रवेश केला. कम्युनिस्ट पक्षांच्या डाव्या विचारसरणीतील परिवर्तनकारी नेते म्हणून भट्टाचार्य यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये कारखानदारी सुरू केली. सिंगूर येथे टाटा नॅनो प्रकल्प उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला.