CM Mamata Banerjee on PM Narendra Modi: फक्त दाढीच वाढते आहे, स्टेडीयमलाही आपलेच नाव दिले; ममता बॅनर्जी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात
एक दंगे भडकविण्यास उद्युक्त करतो. दुसऱ्याने विकासाची गतीच कमी केली. आता तर फक्त त्यांची दाढी वाढते आहे. अनेकदा तर हे रविद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांच्याहीपेक्षा वरचढ समजतात.
West Bengal Assembly Elections 2021: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडण्यापूर्वी जाहीर सभेत त्या बोलत होत्या. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये वसूली सिंडिकेट साठी कमा करत असल्याचा आरोप भाजपने केला होता. हा आरोप परतावून लावत ममता बँनर्जी यांनी भाजपला उद्देशून म्हटले की, त्यांच्याजवळ दोन सिंडिकेट आहेत. एक दंगे भडकविण्यास उद्युक्त करतो. दुसऱ्याने विकासाची गतीच कमी केली. आता तर फक्त त्यांची दाढी वाढते आहे. अनेकदा तर हे रविद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांच्याहीपेक्षा वरचढ समजतात.
ममता बॅनर्जी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला म्हटले होते की, पंतप्रधानांनी स्टेडीयमला आपले नाव दिले. त्यांनी कोविड 19 लसीकरण प्रमाणपत्रावर आपला फोटो लावला. ते इस्त्रे्या माध्यमातून आपला फोटो आंतराळात पाठवत आहेत. एक दिवस असा येईल हे देशालाच स्वत:चे नाव द्या म्हणतील. (हेही वाचा, West Bengal Assembly Election 2021: 'डिस्को डान्सर कोबरा' पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक रिंगणाबाहेरच, मिथुन चक्रवर्ती यांना भाजप तिकीट नाहीच)
दरम्यान, पश्चिम बंगालध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस समोर या वेळी भाजपने जोरदार आव्हान उभे केले आहे. राज्याच्या 294 सदस्यांच्य विधानसभेसाठी 27 मार्च ते 29 एप्रिल दरम्यान आठ टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात राज्यांच्या पाच जिल्ह्यांतील 30 विधानसभा मतदारसंघात मततान होत आहे. हे मतदान 27 मार्चला होत आहे. दुसऱ्या टप्प्यापत चार जिल्ह्यातील 30 विधानसभा मतदारसंघासाठी1 एप्रिल, तिसऱ्या टप्प्प्यासाठी 31 विधानसभा मतदारसघात 6 एप्रिल, चौथा टप्पा 44 जागा 10 एप्रिल, पाचवा टप्पा 45 मतदारसंघ 17 एप्रिल, सहावा टप्पा 43 मतदारसंघ 22 एप्रिल, सातव्या टप्पा 36 मतदारसंघ 26 एप्रिल आणि अंतिम आठव्या टप्प्यात 35 मतदारसंघात 29 एप्रिल या दिवशी मतदान पार पडत आहे.