West Bengal Assembly Election 2021: अभिनेता Mithun Chakraborty पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर दिसण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकाता (Kolkata) येथील ब्रिगेड परेड मैदानावर (Brigade Parade Ground) भव्य रॅली होणार आहे. या रॅलीत ते पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 ( West Bengal Assembly Election 2021) साठी भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

Mithun Chakraborty | (File Image)

अभिनेता मिथून चक्रवर्ती (Actor Mithun Chakraborty) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर दिसण्याची उद्या (7 फेब्रुवारी) शक्यता आहे. मिथून चक्रवर्ती हे केवळ अभिनेतेच नव्हे तर या आधी ते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाकडून राज्यसभा सदस्यही राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकाता (Kolkata) येथील ब्रिगेड परेड मैदानावर (Brigade Parade Ground) भव्य रॅली होणार आहे. या रॅलीत ते पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 ( West Bengal Assembly Election 2021) साठी भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

अभिनेता मिथून चक्रवर्ती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात मुंबई येथील निवास्थानी नुकीतच भेट झाली. पाठिमागील महिन्यात रविवारी (16 फेब्रुवारी) झालेल्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना मिथून चक्रवर्ती यांनी म्हटले की भागवत आणि आपल्यात आध्यात्मिक चर्चा झाली. (हेही वाचा, West Bengal Assembly Elections 2021: ममता बॅनर्जी नंदीग्राम येथून लढणार, 291 TMC उमेदवारांची यादी जाहीर; 100 नव्या चेहऱ्यांना संधी)

भाजपमधील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्ता प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, मिथून चक्रवर्ती हे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या विरोधात अत्यंत महत्त्वाचा चेहरा ठरु शकतात.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष जय प्रकाश मजूमदार म्हणाले, "राज्यात आणि राज्याबाहेरील बंगाली लोक जे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात असलेल्या बंगालबाबत चिंतेत आहेत. हे लोक अत्यंत महत्त्वाचे आहेत. मिथुन चक्रवर्ती हे अशा व्यक्तीपैकीच एक आहेत असेही मुजूमदार यांनी म्हटले आहे.

मिथून चक्रवर्ती हे सध्या वयाच्या सत्तरीत आहेत. गेली अनेक वर्षे सेलिब्रेटी राहिल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. प्रामुख्याने 2006 मध्ये त्याच्या चित्रपटानंतर हा चाहता वर्ग अधिक वाढला आहे. दरम्यान, शारदा चिट फंड प्रकरणात नाव आल्याने अवघ्या दोन वर्षातच त्यांनी राज्यसभा सभागृहाचा राजीनामा दिला. एका ग्रुपद्वारे वित्तपुरवठा करणाऱ्या टीव्ही चॅनलचे ब्रँड अॅम्बेसडर म्हणून त्यांना 1.2 कोटी रुपये मिळाले होते. हे पैसै परत मिळाल्यानंतर त्यांनी राज्यसभा या वरिष्ठ सभागृहाचा राजीनामा दिला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now