Actor Mithun Chakraborty Joins BJP: अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा भाजप प्रवेश
प्रसिद्ध बंगाली आणि बॉलिवूड अभिनेता मिथून चक्रवर्ती यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश (BJP) केला आहे. ते 70 वर्षांचे आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (7 फेब्रुवारी) कोलकाता येथे ब्रिगेड परेड मैदानावर रॅली करत आहेत. तत्पूर्वी मिथून चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रसिद्ध बंगाली (West Bengal ) आणि बॉलिवूड अभिनेता मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश (BJP) केला आहे. ते 70 वर्षांचे आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (7 फेब्रुवारी) कोलकाता येथे ब्रिगेड परेड मैदानावर ( Brigade Parade Ground) रॅली करत आहेत. तत्पूर्वी मिथून चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश (Mithun Chakraborty Joins BJP) केला. मार्च एप्रिल महिन्यामध्ये पार पडत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिथून यांनी केलेला भाजप प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
मिथून चक्रवर्ती हे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या विरोधात अत्यंत महत्त्वाचा चेहरा ठरु शकतात. पश्चिम बंगाल भाजप प्रभारी कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayavargiya) यांनी मिथून चक्रवर्ती यांची त्यांच्या निवास्थानी भेट नुकतीच घेतली होती. ही भेट पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या शहरात घडली. दरम्यान, अभिनेता मिथून चक्रवर्ती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात मुंबई येथील निवास्थानी नुकीतच भेट झाली. पाठिमागील महिन्यात रविवारी (16 फेब्रुवारी) झालेल्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना मिथून चक्रवर्ती यांनी म्हटले की भागवत आणि आपल्यात आध्यात्मिक चर्चा झाली. (हेही वाचा, West Bengal Assembly Election 2021: अभिनेता Mithun Chakraborty पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर दिसण्याची शक्यता)
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष जय प्रकाश मजूमदार म्हणाले, "राज्यात आणि राज्याबाहेरील बंगाली लोक जे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात असलेल्या बंगालबाबत चिंतेत आहेत. हे लोक अत्यंत महत्त्वाचे आहेत. मिथुन चक्रवर्ती हे अशा व्यक्तीपैकीच एक आहेत असेही मुजूमदार यांनी म्हटले आहे.
मिथून चक्रवर्ती हे सध्या वयाच्या सत्तरीत आहेत. गेली अनेक वर्षे सेलिब्रेटी राहिल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. प्रामुख्याने 2006 मध्ये त्याच्या चित्रपटानंतर हा चाहता वर्ग अधिक वाढला आहे. दरम्यान, शारदा चिट फंड प्रकरणात नाव आल्याने अवघ्या दोन वर्षातच त्यांनी राज्यसभा सभागृहाचा राजीनामा दिला. एका ग्रुपद्वारे वित्तपुरवठा करणाऱ्या टीव्ही चॅनलचे ब्रँड अॅम्बेसडर म्हणून त्यांना 1.2 कोटी रुपये मिळाले होते. हे पैसै परत मिळाल्यानंतर त्यांनी राज्यसभा या वरिष्ठ सभागृहाचा राजीनामा दिला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)