Weather Forecast and Updates Today: महाराष्ट्रात तुरळक, काही राज्यात मुसळधार; जाणून घ्या उद्याचे हवामान आणि 18 सप्टेंबरपर्यंतचे पर्जन्यमान
महाराष्ट्रातही मुंबई आणि उपनगरांसह राज्याच्या विविध भागांमध्ये तुरळक पावसाची स्थिती पाहायला मिळू शकते. जाणून घ्या आजचा आणि उद्याचे हवामान कसे असेल याबाबत आयएमडीचे भाकीत.
Weather Update Today: गणपती बाप्पा मोरया (Ganpati Bappa Morya) म्हणत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अनेकांच्या घरी गणरायाचे आगमन झाले. त्यासोबतच वरुणराजानेही दमदार हजेरी लावली. म्हणजे घरात गणपती आणि बाहेर पाऊस अशी स्थिती होती. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये दमदार हजेरी लावली. हिच हजेरी अद्यापही कायम असून, आज आणि उद्याचे हवामान पावसासाठी पोषक आहे. पुढचे काही काळ देशातील काही राज्यांमध्ये दमदार पावसाची शक्यता असल्याचा हवामान अंदाज (Weather Forecast) भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवला आहे. खास करुन छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि झारखंड या राज्यांमध्ये दमदार पाऊस असेल. तर महाराष्ट्रात मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही काही ठिकाणी दमदार पाऊस पाहायला मिळू शकतो.
उद्याचे हवामान आणि 18 सप्टेंबरपर्यंतची स्थिती
आयएमडीने वर्तवलेला हवामान अंदाज सांगतो येत्या 18 सप्टेंबरपर्यंत देशभरातील विविध राज्यांमध्ये मुसधार पाऊस कोसळताना पाहायला मिळू शकतो. म्हणजे आजचे आणि उद्याचे हवामान येत्या बुधवारपर्यंत कायम पाहायला मिळू शकते. खास करुन छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि झारखंड यांसारख्या राज्यामध्ये पावसाचा जोर अधिक पाहायला मिळू शकतो. त्यातही दक्षीण झारखंडमध्ये 15 सप्टेंबर, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेश राज्यात 15 ते 17 तर पश्चिम मध्य प्रदेशमध्ये 17 ते 18 या काळात मुसळधार पाऊस हजेरी लावू शकतो. (हेही वाचा, Weather Forecast: देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस, येथे जाणून घ्या, आजचा अंदाज)
महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय?
महाराष्ट्रातही पाठिमागील काही दिवसांपासून पावसाच्या स्थितीमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी दमदार हजेरी, अशी स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तर पावसासाठी वातावरण पूरकच निर्माण झाले असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही पाहायला मिळत आहे. परिणामी पाठिमागचे दोन दिवस राज्यातील विविध ठिकाणी तूरळक पाऊस पडताना दिसतो आहे. आज (रविवार (15 सप्टेंबर) सुद्धा काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते, असे हवामान विभाग म्हणतो.
आयएमडीने जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राजधानी मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसतील. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यांसह पावसाची उपस्थिती पाहायला मिळू शकते. दरम्यान, उर्वरीत भागात मात्र वातावरण ढगाळ पाहायला मिळू शकते.
बंगालच्या उपसारामध्ये हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्मण झाल्यामुळे पावसासाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाची संभाव्य तीव्रता विचारात घेऊन आयएमडीने काही राज्यांना सुरक्षेचा इशारा दिला आहे. ज्यामध्ये येत्या 15 सप्टेंबरपर्यंत ओडीशा, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यासोबतच नागालँड, मनीपूर, मिझोराम आणि त्रिपूरा या राज्यांनाही येत्या 18 ते 20 सप्टेंबरपर्यंत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.