Weather in India: महाराष्ट्रात मुसळधार; राजस्थान, ओडिशा राज्यांमध्ये दमदार पावसाची शक्यता
Heavy Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

संपूर्ण भारतासाठीच पुढचे काही दिवस महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) हवामानाचा अंदाज (Weather in India) व्यक्त केला आहे. या अंदाजात आयएमडीने (IMD) म्हटले आहे की, पुढील काही काळात देशभरातील विविध राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावासाची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यांनी सतर्क राहावे असेही आयएमडी सांगते. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र (Maharashtra Rain) , राजस्थान आणि ओडिशा राज्यांमध्ये अधिक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाराष्ट्र:

बेटांचे शहर असलेल्या मुंबई आणि उपनगरामध्ये पाठिमागील 24 तासांत अनुक्रमे 37.71 मिमी, 43.38 मिमी आणि 36.88 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईसह उर्वरीत महाराष्ट्रात पुढच्या 24 तासांत मुसळधार ते अतिवृष्टीच्या शक्यतेसह मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे, असे ते म्हणाले. (हेही वचाा, Mumbai: मुंबईत पुढील वर्षी पाणीकपात होणार नाही; मुसळधार पावसामुळे सातही तलाव जवळपास भरले)

दिल्ली:

दिवसा ढगाळ आकाश आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

राजस्थान:

पूर्व राजस्थानच्या बहुतांश भागात शुक्रवारपासूनच पावसाचा जोर कमी होईल आणि पुढील तीन ते चार दिवसांत काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता. पश्चिम राजस्थानच्या बहुतांश भागात 17 सप्टेंबरपासून हवामान कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. राज्यात मान्सून चांगला गेला असून बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे, असेही ते म्हणाले.

ओडिशा

रविवारच्या सुमारास वायव्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ होण्याची शक्यता. त्याच्या प्रभावामुळे पुढचे 48 तास संबंधित प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता. परिणामी पुरी, कालाहंडी, कंधमाल, बोलांगीर, गजपती, गंजम आणि जगतसिंगपूर जिल्ह्यांमध्ये रविवारी काही ठिकाणी 7-10 मिमी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सोमवारी खुर्द, कटक आणि पुरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.