Weather Forecast India: भारतातील विविध राज्यांत मुसळधार पाऊस, सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी; IMD कडून हवामान अंदाज जारी

उत्तराखंड (Uttarakhand), केरळ राज्यांसह देशभरातील विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षीत असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. यंदाच्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी (Heavy Rainfall) होण्याची शक्यता आहे, असा हवामान अंदाज (Weather Forecast India) आयएमडीने यापूर्वीच व्यक्त केला आहे.

Weather Forecast India | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उत्तराखंड (Uttarakhand), केरळ राज्यांसह देशभरातील विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षीत असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. यंदाच्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी (Heavy Rainfall) होण्याची शक्यता आहे, असा हवामान अंदाज (Weather Forecast India) आयएमडीने यापूर्वीच व्यक्त केला आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी महापूर आला. ज्यामध्ये 14 जणांचा मृत्यू आणि 10 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. पूर आणि पावसाचा फटका बसल्याने काही ठिकाणी घरे, दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. केरळमधील वायनाड भूस्खलन दुर्घटनेत अद्यापही मदत आणि बचाव कार्य सुरुच आहे. या ठिकाणी मृतांची आणि बेपत्ता असलेल्या लोकांची संख्या अजूनही वाढते आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घ्या देशभरातील पावसाची स्थिती.

केदारनाथ यात्रा स्थगित

मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. घोरापराव, लिंचोली, बडी लिंचोली, आणि भिंबळी येथे खड्ड्यांमुळे पायी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. उत्तराखंड सरकारने सांगितले की, पंतप्रधान कार्यालयाने परिस्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर केंद्राने बचाव कार्यात मदत करण्यासाठी भारतीय हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर पाठवली आहेत. आतापर्यंत 425 यात्रेकरूंची हेलिकॉप्टरने सुटका करण्यात आली असून, बचाव पथकाच्या मदतीने 1100 यात्रेकरू पायी चालत सोनप्रयागला पोहोचले आहेत. (हेही वाचा, Kedarnath Accident: केदारनाथ यात्रेदरम्यान दरड कोसळून 3 भाविकांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता (Watch Video))

हिमाचल प्रदेशमध्ये मान्सूनचा कहर

मान्सूनच्या तीव्र परिणामांचा सामना हिमाचल प्रदेशलाही करावा लागला. या राज्यात ढगफुटीमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे 50 जण बेपत्ता झाले आहेत. चिखल आणि पाण्याच्या प्रवाहाने घरे, रस्ते आणि पूल वाहून गेले. कुल्लू, मंडी आणि शिमला जिल्ह्यात ढगफुटीमुळे मनाली-चंदीगड राष्ट्रीय महामार्गाचे नुकसान झाले. या राज्यात आणखी पाऊस कोसळेल असा हवामान अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. (हेही वाचा, Uneven Monsoon Rains in India: भारतात मान्सून पाऊस असमान, देशातील 25% प्रदेश अद्यापही कोरडाच; स्थानिकांना येईना हवामान अंदाज)

जम्मू-काश्मीरमध्ये अचानक पूर

मुसळधार पावसामुळे जम्मू आणि कश्मीरच्या काही भागांमध्ये अचानक पूर आला, पावसाचे पाणी दुकानांमध्ये आणि घरांमध्ये घुसल्याने मोठी गैरसोय झाली. IMD ने पुढील पाच दिवस या प्रदेशात अधूनमधून पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला असून, अतिसंवेदनशील भागात अचानक पूर, ढगफुटी, भूस्खलन आणि चिखलाचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

राजस्थानमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत

राजस्थानमध्ये, जयपूरमधील घराच्या तळघरात पावसाच्या पाण्याचा पूर आल्याने बुडालेल्या तीन लोकांमध्ये सहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. जयपूरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चुरूमध्ये मुसळधार पावसामुळे सुमारे 100 वर्षे जुनी इमारत कोसळली, तर कोटामध्ये बस 20 फूट खोल खड्ड्यात पलटी होऊन चार प्रवासी जखमी झाले.

गोव्यात ऑरेंज अलर्ट

IMD ने गोवा राज्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला, 55 किमी/तास वेगाने वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला. दक्षिण गोव्यातील क्यूपेममध्ये 200 मिमी पावसाची नोंद झाली, जो राज्यातील सर्वाधिक आहे. ढगाळ वातावरणामुळे मच्छीमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

केरळमध्ये भूस्खलन

केरळच्या वायनाड जिल्ह्यात, भूस्खलनात मृतांची संख्या 289 वर पोहोचली आहे. बचाव कार्य चालू आहे आणि मृतांची संख्या वाढू शकते.

संपूर्ण भारतातील हवामानाचा अंदाज

IMD ने पुढील चार दिवसांत पश्चिम आणि मध्य भारतात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह वायव्य भारतातही पाऊस पडेल. कर्नाटक, लक्षद्वीप, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ईशान्येकडील काही भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now