Weather Forecast: मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता, आयएमडीकडून विविध राज्यांमध्ये 'रेड अलर्ट' जारी

खास करुन उत्तराखंड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल-सिक्कीम, बिहारमध्ये आज आणि उद्या म्हणजे 23 आणि 24 ऑगस्ट रोजी अत्यंत मुसळधार पाऊस बरसू शकतो.

Rain | representative pic- (photo credit -pixabay)

India Meteorological Department Weather Forecast: पावसाचे दर्शन यंदा तुरळकच आहे. ऐन पावसाळ्यात उन्हाळा भासावा अशी स्थिती आहे. त्यामुळे यंदा वरुणराजा मनासारखा बरसणार की नाही? या चिंतेत बळीराजा आणि मुंबईकर आहे. कारण यंदा मुंबईतही म्हणावा तसा पाऊस नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धणरे ऑगस्टमहिन्याचा मध्य उलटून गेला तरीही पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. असे असले तरी एकूण देशाचा विचार करता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस दमदार आगमन करण्याची शक्यता आहे. खास करुन उत्तर भारतात. आयएमडीने (IMD) वर्तवलेला हवामानाचा अंदाज सांगतो की, राधानी दिल्लीसह देशातील विविध राज्यांमध्ये पुन्हा एकदा पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. खास करुन उत्तराखंड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल-सिक्कीम, बिहारमध्ये आज आणि उद्या म्हणजे 23 आणि 24 ऑगस्ट रोजी अत्यंत मुसळधार पाऊस बरसू शकतो.

आयएमडीने पुढे म्हटले आहे की, पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारचा उत्तरी भाग आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल-सिक्कीम आणि ईशान्य भारतात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. पावसाचे हे प्रमाण पुढे हळूहळू कमी होत जाईल. आयएमडीचा अंदाज सांगतो की, उत्तर प्रदेश राज्यात पावसाचे जोरदार आगमन होईल. जेणेकरुन या राज्याला उष्णतेपासून दिलासा मिळेल. वातावरणानुसार या राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ट्विट

दुसऱ्या बाजूला हिमाचल प्रदेशमध्येही मेघगर्जनेसह पावसाचे पुनरागमन होऊ शकते. त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये जवळपास आठ राज्यांमध्ये रेड अलर्ट जाली आहे. तेलंगणा, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर, सिक्कीम, हिमाचल प्रदेश आदी राज्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शक्यता आहे.