वारीस पठाण यांनी मागे घेतले 15 कोटी मुस्लिम 100 कोटींवर भारी पडतील हे वादग्रस्त विधान; सर्व धर्माचा आदर करतो म्हणत व्यक्त केली दिलगिरी

15 कोटी मुस्लिम हे 100 कोटींवर भारी पडतील असे म्हणणाऱ्या वारीस पठाण (Waris Pathan) यांनी नुकतंच मुंबई (Mumbai) मध्ये एक पत्रकार परिषद घेऊन आपले विधान मागे घेतले आहे, आपण सर्व धर्माचा आदर करतो मात्र माध्यमांनी आपल्या बोलण्याचा विपर्यास केला आहे, तरीही माझ्या विधानावरून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी ते वक्तव्य मागे घेतो असेही पठाण यांनी म्हंटले आहे

MIM MLA Waris Pathan | (Photo Credits: Facebook)

15 कोटी मुस्लिम हे 100 कोटींवर भारी पडतील असे म्हणणाऱ्या वारीस पठाण (Waris Pathan) यांनी नुकतंच मुंबई (Mumbai) मध्ये एक पत्रकार परिषद घेऊन आपले विधान मागे घेतले आहे, आपण सर्व धर्माचा आदर करतो मात्र माध्यमांनी आपल्या बोलण्याचा विपर्यास केला आहे, तरीही माझ्या विधानावरून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी ते वक्तव्य मागे घेतो असेही पठाण यांनी म्हंटले आहे. या स्पष्टीकरणानंतर वारीस पाठ यांच्यावरील संकट कमी होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पठाण यांच्या सोबतच AIMIM नेते इम्तियाझ जलील यांनी सुद्धा पठाण यांच्या वक्तव्याचा 'हा' प्रश्न संपला आहे, असे सांगत या चर्चांना विराम लावण्याचा प्रयत्न केला आहे.

वारीस पठाण यांनी पत्रकार परिषदेत, "ते वक्तव्य हिंदूविरोधी नाही. किंवा कोणत्याच धर्माच्या विरोधात नाही, उलट वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे आणि मला आणि माझ्या पक्षाला बदनाम केलं जातं आहे असं म्हटलं आहे. तसेच आपण 100 कोटी भारतीयांच्या विरोधात नाही तर 15 कोटी मुस्लीम हे 100 लोकांच्या विरोधात आहेत असं बोललो होतो. ते 100 लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा यांच्यातले आहेत. काही पत्रकारही आहेत, भाजपाच्या 100 नेत्यांविरोधात मी बोललो होतो. मी देशविरोधी नाही माझ्या वक्तव्याचा विपर्यास जाणीवपूर्वक केला गेला" असेही पठाण यांनी स्पष्ट केले आहे. तरीही मी जे काही बोललो त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी ते वक्तव्य मागे घेतो अशा शब्दात पठाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

दरम्यान, गुलबर्गा येथे झालेल्या एका सभेच्या दरम्यान वारीस पठाण यांनी अशा प्रकारचे विधान केले होते, यांनतर सर्व स्तरातून पाठ यांचा विरोध केला जात होता, आज हक- ए- हिन्दुस्थान या मुस्लिम संघटनेने तर पठाण यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 11 लाख रुपये बक्षीस देऊ अशी हि घोषणा केली होती, रातर दुसरीकडे राष्ट्रीय असताना पठाण यांना एआयएमआयएम कडून माध्यमांशी संवाद साधण्यावर बंदी घालण्यात आली होती. या सर्व विरोधाच्या नंतर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असे म्हणत पठाण यांनी वेळ मारून घेण्यासाठी माघार घेतल्याचे समजत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif