Vladimir Putin Bathing in Blood: व्लादिमीर पुतिन करतात हरणांच्या रक्ताने आंघोळ, दिला कुत्रे आणि गरुडांचा बळी; पत्रकाराचा खळबळजनक दावा

संशोधकांच्या मते, पुतिन आणि त्यांना ओळखणारे अनेक जवळचे लोक जादुई गोष्टींवर विश्वास ठेवतात.

Vladimir Putin | (Photo Credits: Wikimedia Commons)

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याबाबत सतत नवनवीन दावे होत आहेत. याआधी बातमी होती की, परदेशी दौऱ्यावेळी पुतीन यांचे 'मल-मूत्र' गोळा केले जाते व ते खास बॉक्समधून रशियाला पाठवले जाते. आता तज्ञांच्या हवाल्याने असे सांगितले जात आहे की, पुतीन यांना काही खास विधींमध्ये रस आहे. त्यांना रक्ताशी संबंधित अनेक विधी करायला आवडतात. ओलेग काशीन (Oleg Kashin) या रशियन पत्रकाराचा हवाला देत, ‘द सन’च्या वृत्तात पुतिन अंधश्रद्धाळू असल्याचे सांगत त्यांनी काळ्या कुत्र्याचा आणि गरुडाचा बळी दिल्याचे म्हटले आहे.

याशिवाय पुतीन यांनी आपली सेक्स ड्राईव्ह वाढवण्यासाठी एका प्रकारच्या जादुई हरणाच्या रक्ताने आंघोळही करत असल्याचे नमूद केले आहे. संशोधकांच्या मते, पुतिन आणि त्यांना ओळखणारे अनेक जवळचे लोक जादुई गोष्टींवर विश्वास ठेवतात. अशा लोकांच्या या वृत्तीमुळेच युक्रेनवर हल्ला झाला, हाही अभ्यासकांचा विश्वास आहे. (हेही वाचा: परदेशी दौऱ्यावेळी Vladimir Putin यांचे 'मल-मूत्र' केले जाते गोळा; खास बॉक्समधून पाठवले जाते रशियाला, जाणून घ्या कारण)

पुतिन यांच्याबाबत अशा बातम्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2017 मध्येही यासंदर्भात एक वृत्त प्रसिद्ध झाले होते. रशियाच्या शोध पत्रकारिता फर्म प्रोएक्टने तो दावा केला होता. आता पुन्हा एकदा पत्रकार काशीन यांच्या दाव्यानंतर, सत्तेत राहण्यासाठी पुतीन बलिदान देत असल्याची चर्चा रंगली आहे. KGB एजंट जॉर्जी रोगोझिन यांनी पुतिनमध्ये ही अंधश्रद्धा रुजवली असल्याचे सांगितले जाते.

रोगोगिन स्वतः KGB कमांडर होते, ज्यांना टेलीपॅथी, पॅरासायकॉलॉजी यांसारख्या संशोधन क्षेत्रात रस होता. 2014 मध्ये त्यांचे निधन झाले. पण त्यांचा प्रभाव पुतीनवर अजूनही आहे. रिपोर्टरच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी जॉर्जीने सांगितले होते की, ते इतरांची मने वाचू शकतात. त्यांनीच पुतीन यांना सांगितले होते की, अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री मॅडेलीन अल्ब्रिडे रशियाचा द्वेष करतात आणि रशियापासून सायबेरिया काढून घेण्याचा त्यांचा निर्धार आहे.